शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

सणासुदीच्या दिवसांत पाणीकपात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 05:42 IST

धरणांतील पाणीसाठा घटला : प्रशासनाच्या हालचाली सुरू; १४ ते १५ टक्के कपातीची शक्यता

सुरेश लोखंडे

ठाणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पडलेला कमी पाऊस आणि धरणात कमी झालेला साठा, यामुळे ऐन नवरात्री आणि दिवाळीच्या दिवसांत जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी प्रशासनाच्या जोरदार हालचाली सुरू असून पुढील आठवड्यात पाणीकपातीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे १४ टक्के पाणीकपात लागू केली होती. फेब्रुवारीत ती कमी करून सात टक्के केली. त्यानंतर, एप्रिल-मेपासून कपात रद्द केली; पण उल्हासनगर महापालिकेने आताचा पावसाळा संपला, तरी एक दिवसाची पाणीकपात कायम ठेवून वेठीस धरले. उल्हासनगरच्या बहुतांश भागात शुक्रवारी दिवसभर पाणी सोडले जात नाही. महापालिकेच्या या मनमानीची झळ वर्षभरापासून नागरिकांना सोसावी लागत आहे. यावेळीही सक्तीच्या पाणीकपातीला त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हाभरात सुमारे १४ ते १५ टक्के सक्तीच्या पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे.यंदा सरासरी दोन हजार ५१७.९१ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी तीन हजार ३४३.३४ मिमी पडला होता. मागील वर्षी परतीचा पाऊस जोरदार होता. ओखी चक्रीवादळाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला होता. यंदा मात्र परतीच्या पावसाकडूनही उपेक्षाच होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आगामी तीन दिवसांत परतीचा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यामुळे धरण भरण्याची शक्यता नसल्यामुळे पुढील आठवड्यापासून १४ ते १५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाणीकपात लागू करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे.धरणातील पाणीसाठाशंभर टक्के भरलेल्या बारवी धरणात आता २२६.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. या धरणात मागील वर्षी १०० टक्के म्हणजे २३३.०७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता. तरीदेखील १४ टक्के पाणीकपात लागू केली होती.त्यावेळी धरणाखालील पाणी उचलण्यात येत होते. आता मागील १५ दिवसांपासून धरणातील पाणीपुरवठा शहरांना करावा लागत आहे. यामुळेही साठा झपाट्याने कमी झाला आहे.उल्हास नदीच्या आंध्रा धरणातही ३२४.२२ दशलक्ष घनमीटर (९५.६० टक्के) साठा आहे. या तुलनेत मागील वर्षी तो ३३७.३८ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९९.४८ टक्के पाणीसाठा असतानाही पाणीकपात लागू केली होती.आता सर्वच धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे. यामुळे यंदा लवकर कपात लागू करून १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरवण्याची तजवीज जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.च्मुंबईसह ठाणे महापालिकेलापाणीपुरवठाकरणाऱ्या भातसाधरणातम्हणजे८८५.८६दशलक्ष घनमीटरपाणीसाठा आहे. याधरणात मागील वर्षी ९३७.४० दशलक्ष घनमीटर (९९.५० टक्के) पाणीसाठा होता.च्यंदा या धरणात केवळ सरासरी २०६४ मिमी पाऊस पडला. मागील वर्षी तो सरासरी ३२०३ मिमी म्हणजे यंदाच्या तुलनेत सरासरी एक हजार १३९ मिमी जादा पाऊस पडला होता.च्याप्रमाणेच ठाणे शहराच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर या नगरपालिकांना पाणीपुरवठा करणाºया बारवी धरण व उल्हास नदीला पाणीपुरवठा करणाºया आंध्रा धरणातही मागील वर्षाच्या तुलनेत कमी साठा आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका