शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

उपायुक्तांवर फेकली पाण्याची बाटली

By admin | Updated: April 25, 2017 00:09 IST

महापालिका महासभेत उपायुक्तांच्या दिशेने पिण्याच्यापाण्याची बाटली भिरकावणे आणि महापौर हाय-हाय... घोषणांनी सभागृह दणाणून सोडणे

उल्हासनगर : महापालिका महासभेत उपायुक्तांच्या दिशेने पिण्याच्यापाण्याची बाटली भिरकावणे आणि महापौर हाय-हाय... घोषणांनी सभागृह दणाणून सोडणे, अशा शिवसेना नगरसेवकांच्या गोंधळाने दुसरी महासभा सोमवारी गाजली. या गदारोळात महापौर मीना आयलानी व सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांनी पटलावरील कामकाज उरकले. उल्हासनगर महापालिकेची महासभा विशेष समिती सदस्यांच्या निवडीवरून वादळी ठरण्याचे संकेत प्राप्त झाले होते. काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे, भारिपच्या नगरसेविका कविता बागुल यांनी काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश केला. सुभाषटेकडी प्रभाग क्र. १८ मधील पाणीटंचाईची समस्या सुटत नाही, तोपर्यंत सभागृहात उभे राहणार असल्याचे या नगरसेविकांनी महापौरांना सांगितले. आठवड्यात फक्त दोन दिवस आणि तेही अर्धा तास पाणी येते, नागरिक हातपंपाचे दूषित पाणी पित असल्याने हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नगरसेवक प्रमोद टाले, सुमित सोनकांबळे, ज्योत्स्ना जाधव, ज्योती माने यांनीही सुभाष टेकडी परिसरातील पाणीटंचाईचा पाढा वाचला.सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री, सुनीता बगाडे, मीना सोंडे, वसुधा बोडारे, राजश्री चौधरी, दीपा पंजाबी, किशोर वनवारी, राजेश वधारिया, रमेश चव्हाण, टोनी सिरवानी आदींनी चर्चेत भाग घेतला. तब्बल दोनतास पाणीटंचाईवर महासभा गाजली. महासभेच्या पटलावरील विषय प्रभारी सचिव व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी वाचण्यास सुरुवात करताच शिवसेना नगरसेवकांनी त्याला विरोध केला. गेल्या महासभेतील आयुक्तांचे राहिलेले निवेदन पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र, महापौरांच्या सूचनेनुसार लेंगरेकर यांनी पटलावरील विषय वाचताच नगरसेवक सुनील सुर्वे यांनी पाण्याची बाटली उपायुक्त लेंगरेकर यांच्या दिशेने फेकून मारली. याप्रकाराने महासभेतील वातावरण चिघळले. लेंगरेकर यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला, तर शिवसेना नगरसेवकांनी महापौर हाय-हाय घोषणा सुरू केल्या. सत्ताधारी नगरसेवक राजेश वधारिया, किशोर वनवारी यांनी विषय मताला टाकण्याची मागणी केली. सभागृह नेते पुरस्वानी यांनी विरोधी नगरसेवकांची समजूत काढत आयुक्तांना गेल्या महासभेतील निवेदन करण्यास सांगितले. (प्रतिनिधी)