शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात इमारतीच्या सेक्रेटरीकडून वॉचमनचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:55 IST

कॅम्प नं. २ खेमानी परिसरातील मेनका पॅलेस या इमारतीच्या सेक्रेटरीनेच वॉचमनचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

उल्हासनगर : कॅम्प नं. २ खेमानी परिसरातील मेनका पॅलेस या इमारतीच्या सेक्रेटरीनेच वॉचमनचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सेक्रटरी तलरेजा यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून साफसफाईच्या क्षुल्लक कारणावरून खून झाल्याचे उघड झाले.विकास सोनार आणि त्याचे कुटुंब हे मेनका पॅलेस येथे वॉचमनचे काम करते. सोमवारी इमारतीची साफसफाई का केली नाही, असा प्रश्न इमारतीचा सेक्रटरी विक्की तलरेजा यांनी विकास सोनार यांना केला. आजारी असल्याने साफसफाई केली नाही, आता करतो असे वॉचमनने सांगितले. यावरून दोघांत बाचाबाची झाली. विक्की याने रागाच्या भरात वॉचमनला मारहाण केली आणि तो निघून गेला. खाली निपचित पडलेल्या वॉचमनला पत्नी अनिता हिने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेने पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसला आहे.मारहाण तसेच गळा दाबल्याने वॉचमनचा मृत्यू झाल्याचे उल्हासनगर पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी इमारतीचा सेक्रटरी विक्की तलरेजा यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेने उल्हासनगर परिसरात खळबळ उडाली असून, क्षुल्लक कारणावरून खून करण्याचा प्रकार दु:खदायक असल्याचे बोलले जाते.