शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

घरफोडी करणा-या चोरांनी केली वॉचमनची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:41 PM

भिवंडी : शहरालगत खोणी गावात घरफोडी करण्यासाठी अडसर ठरलेल्या वॉचमनची चोरांनी हत्या करून कारखान्याच्या कार्यालयांतील किमती सामान पळविले.खोणी गावातील रिध्दी -सिध्दी कंपाऊण्डमध्ये अशोका टेक्सटाईल नावाचा यंत्रमाग कारखाना आहे.काल रात्री दरम्यान चोरी करण्याच्या उध्देशानेकारखान्याच्या मागील बाजूस भगदाड पाडण्यास सुरूवात केली.याची खबर लागताच वॉचमन गुरूदेव पांडे याने त्यांना विरोध केला.तेंव्हा चोरांनी मिळून ...

ठळक मुद्देघरफोडी करण्यासाठी अडसर ठरलेल्या वॉचमनची चोरांनी हत्याचोरांनी मिळून वॉचमनच्या डोक्यात केला लोखंडी रॉडने प्रहारकारखान्याच्या व्यवस्थापकाने केली पोलीसांत तक्रार

भिवंडी : शहरालगत खोणी गावात घरफोडी करण्यासाठी अडसर ठरलेल्या वॉचमनची चोरांनी हत्या करून कारखान्याच्या कार्यालयांतील किमती सामान पळविले.खोणी गावातील रिध्दी -सिध्दी कंपाऊण्डमध्ये अशोका टेक्सटाईल नावाचा यंत्रमाग कारखाना आहे.काल रात्री दरम्यान चोरी करण्याच्या उध्देशानेकारखान्याच्या मागील बाजूस भगदाड पाडण्यास सुरूवात केली.याची खबर लागताच वॉचमन गुरूदेव पांडे याने त्यांना विरोध केला.तेंव्हा चोरांनी मिळून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला.तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उध्देशाने त्यांनी लोखंडी पाण्याची मोटार त्याच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली. कारखान्याच्या मागील पाडलेल्या भगदाडातून चोर कार्यालयांत शिरले आणि त्यांनी कार्यालयांतील एलईडी टिव्ही,डीव्हीआर मशीन,सीसीटिव्ही कॅमेरा,कॉम्प्रेसरपंप व वायरबंडल आदि सामान चोरून नेले. आज सकाळी कारखान्याचे व्यवस्थापक शंकर सिताराम सिंग हे कारखान्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.तेंव्हा त्यांनी ही घटना पोलीसांना कळविली.पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व वॉचमनचा मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरागांधी रूग्णालयांत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात वॉचमनच्या हत्येबाबत अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून