शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कचरा वर्गीकरणापुढे उपायुक्तांकडून पदभार काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:33 IST

भार्इंदर पालिका । भाजपच्या ठरावाला सेना, काँग्रेसचे समर्थन

भाईंदर : नालेसफाई नीट झाली नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहांची सफाई नीट होत नाही तसेच कचरा उचलण्यात केला जाणारा भेदभाव आदी कारणे मांडत सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी शुक्रवारच्या महासभेत मीरा-भार्इंदर महापालिकेचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याकडून आरोग्य आणि वैद्यकीय विभागांचा पदभार काढून घेण्याचा ठराव केला. ठरावास शिवसेना, काँग्रेसनेही समर्थन दिले.

मीरा-भार्इंदर महापालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करून न दिल्यास त्या गृहनिर्माण संस्थांचा कचरा उचलणे बंद केले आहे. नळजोडणी खंडित करण्याच्या नोटिसाही बजावल्या आहेत. घनकचरा अधिनियमानुसार ओला व सुका कचरा वेगळा करून देणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक आहे. शिवाय, पालिकेने उत्तन येथे सुरू केलेल्या कचरा प्रकल्पातही कचरा वेगळा करून दिल्यास त्यावर प्रक्रिया करणे शक्य होते. त्यामुळे पालिकेने कचरा वर्गीकरण करून देणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचा कचरा उचलणे बंद केले. त्यामुळे अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग लागले आहेत. कचरा साचून राहिला तरी अनेक लोक वर्गीकरण मात्र करूनच देत नसल्याने दुर्गंधी पसरते.शुक्रवारच्या महासभेत भाजपचे अ‍ॅड. रवी व्यास, ध्रुवकिशोर पाटील, दीपिका अरोरा, मीरादेवी यादव, नयना म्हात्रे, पंकज पांडेय आदी नगरसेवकांनी कचरा उचलण्यात प्रशासन भेदभाव करत असल्याचा आरोप केला. भार्इंदरच्या कोठार झोपडपट्टी, गीतानगर आदी भागांचे दाखले देऊन तेथे कचरा एकत्रच टाकला जात असताना तो उचलते. मग, इमारतींमधील कचरा उचलण्यास नकार देऊन भेदभाव करते अशी टीका केली.अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होईलभाजपचे जयेश भोईर यांनी पानपट्टे यांच्याकडून आरोग्य आणि वैद्यकीय विभागांचा पदभार काढून घेण्याचा ठराव मांडला. त्याला सभापती विनोद म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी पानपट्टे हे अनुभवी असून चुका झाल्या असतील, तर त्या सुधारून घेण्यास सांगा व संधी द्या, असे सांगितले. तर, अतिरिक्त आयुक्त सुनील लहाने यांनीही पानपट्टे यांची बाजू घेत टॉर्चर करू नका, अधिकाºयांचे खच्चीकरण होईल, अशी विनंती नगरसेवकांना केली. परंतु, भाजप नगरसेवकांनी मांडलेल्या ठरावास विरोध न झाल्याने तो सर्वानुमते मंजूर झाला. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर