शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या रँकमध्ये सुधार करण्यासाठी आता रात्रीही होणार मार्केट परिसरातील मुख्य रस्त्यांची धुलाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 17:41 IST

स्वच्छतेचा रँकमध्ये सुधार करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता शहरातील मार्केट परिसर, व्यावसायिक आस्थापना असलेल्या रस्त्यांचीसुध्दा धुलाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे४ कोटी ८४ लाखांचा खर्च अपेक्षितप्रस्तावाला महासभेत मिळाली मंजुरी

ठाणे - स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ठाणे शहराचा गेल्या वर्षी ११६ क्र मांकावर असलेला रँक ४० वर आला असला तरी, यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी आता ठाणे महापालिकेने महत्वाची पाऊले उचलण्यास सुरु वात केली आहे. ठाणे शहराच्या मुख्य रस्त्यांची सफाई दिवसा होत असली तरी, रात्रीच्या स्वच्छतेसाठी देखील या अभियानामध्ये गुण असल्याने आता मार्केट परिसर, व्यावसायिक आस्थापना असलेल्या रस्त्यांची सफाई आता रात्रीच्या सत्रात करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी खाजगी सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यामुळे आता दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळा होणार आहे.                             गेल्या वर्षी ठाणे शहराचा स्वच्छतेमधला रँक हा १६६ व्या क्र मांकावर होता. मात्र यावर्षी ठाणे शहराचा रँक हा ४० वर आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून सकाळ आणि नंतरच्या किंवा रात्रीच्या सत्रात सुध्दा मार्केट परिसराला लागून असलेल्या किंवा वाणिज्य आस्थापना असलेल्या मुख्य रस्त्यांची सफाई करणे आवश्यक असून यासाठी विशेष गुण ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता रात्रीच्या सत्रात देखील या मुख्य रस्त्यांची स्वच्छता करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे.                    ठाणे महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ १२८ चौ. मी. आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्या आहे. ठाणे शहरात दररोज ४ लाख नागरिकांची ये - जा सुरु असते. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील रत्स्यावर निर्माण होणाऱ्या कचºयामध्ये देखील वाढ होत आहे. ठाणे महापालिकेकडे कायस्वरूपी २२१२ सफाई कामगार आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येनुसार कामगारांची ही संख्या अपूर्ण असल्याने सकाळच्या सत्रात मुख्य रस्त्यांची सफाई करण्यासाठी खाजगी संस्थेच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय एकीकडे घेण्यात आला असला तरी आता स्वच्छ भारत अभियानामधला रँक वाढवण्यासाठी रात्रीच्या सत्रामध्ये देखील वाणिज्य आस्थापना असलेल्या मुख्य रस्त्यांची सफाई केली जाणार आहे.                      रात्रीच्या सत्रात काम करण्यासाठी खाजगी कामगारांची नियुक्ती करण्यासाठी वार्षिक खर्च ४ कोटी ८४ लाख इतका खर्च अपेक्षित असून हा खर्च आता महासभेच्या मंजुरीसाठी आणण्यात आला आहे. हा ठेका वर्षभरासाठी दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. खाजगीकरणातून रस्ते सफाई या लेखा शीर्षकांतर्गत यासाठी निधी प्रस्तावित करण्यात आला असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त