शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

रुग्णालयातील वॉर्ड बॉय दारूच्या नशेत टुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 01:25 IST

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आॅर्थो विभागात काम करणारा नाथा मोहतमल हा वॉर्ड बॉय दारू पिऊन रुग्णालयाच्या आवारात मदहोश अवस्थेत पडलेला आढळल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली.

ठाणे : कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आॅर्थो विभागात काम करणारा नाथा मोहतमल हा वॉर्ड बॉय दारू पिऊन रुग्णालयाच्या आवारात मदहोश अवस्थेत पडलेला आढळल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली. ही बाब समोर येताच रुग्णालय प्रशासनाने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवून त्याला सक्तीच्या रजेवरही पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.ठामपाच्या कळवा रु ग्णालयात दररोज सुमारे दोन हजारांहून अधिक रु ग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथे लोकांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशा गर्दीच्या वेळी बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नाथा नावाचा वॉर्ड बॉय रु ग्णालयाच्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह दारूच्या नशेत पडलेल्या अवस्थेत आढळला. तो रुग्णालयाच्या वॉर्ड क्र मांक ९ येथील आॅर्थो विभागात काम करतो. या वॉर्डातील डॉक्टरांनी त्याच्याकडे महत्त्वाच्या कागदपत्रांची फाइल दिली होती.मात्र, त्याने ती संबंधित विभागात न पोहोचवता दारूच्या नशेत रु ग्णालयाच्या आवारात असलेल्या हिरवळीवर गणवेशावरच तो मदहोश अवस्थेत पडला होता. तसेच त्याच्याजवळच कागदपत्रांची फाइल पडली असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा चर्चेचा विषय झाला होता. रु ग्णालयाच्या आवारात गस्त घालत असताना रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांना हे दृश्य दिसले. त्यांनी तत्काळ रु ग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता प्रशासनाने त्याला रात्री ११ च्या सुमारास पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, त्याचे रक्त तपासणीकरिता काढून घेतले असून त्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता रुग्णालय सूत्रांनी वर्तवली आहे.>नाथा हा वॉर्ड बॉय जेव्हा कामावर आला होता, तेव्हा त्याने मद्यप्राशन केले नव्हते. पण, मधल्या वेळेत त्याला जेव्हा त्याच्या वरिष्ठांनी कार्यालयीन काम सांगितले आणि तो बाहेर गेला होता. त्यानंतर तो तब्बल एक ते दीड तास न परतल्याने त्याचा शोध घेतला असता तो रु ग्णालयाच्या आवारातील हिरवळीवर पडलेला रु ग्णालयाच्या सुरक्षारक्षकांना आढळला. याबाबत माहिती मिळाल्यावर आपण त्वरित त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांच्या तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्याला तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तसेच त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात अहवाल महापालिकेच्या कार्मिक विभागाकडे पाठवला जाईल.- डॉ. संध्या खडसे, अधिष्ठाता, कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय.