शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या निर्णयावरुन रात्रीत घूमजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:50 IST

ठाणे महानगरपालिकेची शासनाने केली कानउघाडणी : संपूर्ण हाॅटस्पाॅटऐवजी मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे  : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने ज्या भागात कोरोनारुग्ण आढळत आहेत, अशी सात प्रभाग समितींमधील १६ हॉटस्पॉट शोधून ३१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन सोमवारी घोषित केला होता. परंतु, राज्य शासनाच्या कोणत्याही सूचना नसताना तो घोषित केल्याने मंत्रालयीन पातळीवरून कानउघाडणी झाल्यानंतर एका रात्रीतच पालिकेने घूमजाव करून मंगळवारी या हॉटस्पॉटमध्येच मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करून त्या ठिकाणीच लॉकडाऊन करणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये एखाद्या इमारतीच्या मजल्यावर किंवा झोपडपट्टीच्या भागात एखाद्या ठिकाणी रुग्ण आढळल्यास तो स्पॉट मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित करून तेथेच लॉकडाऊन घेतला जाणार आहे.ठाणे   महानगरपालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत ज्या हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन होता तो आता पुढील ३१ मार्चपर्यंत  वाढविल्याची माहिती महापालिकेने दिली होती. परंतु, राज्य शासनाने अद्याप काही सूचना दिल्या नसताना सरसकट लॉकडाऊन कसे घोषित केले, अशा शब्दांत राज्य सरकारकडून कानउघाडणी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेने आता एका रात्रीत आपला निर्णय मागे घेऊन सरसकट लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगून त्या भागातील आजूबाजूचे भाग नियमितपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आजही शहरातील काही भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये माजिवडा-मानपाडा, लोकमान्य-सावरकरनगर, वर्तकनगर, उथळसर, नौपाडा, कळवा आदी भागांचा समावेश आहे. माजिवडा-मानपाडा प्रभागात तर रोजच्या रोज ४० ते ५० रुग्ण आढळून येत आहेत. काही दिवसांत येथील परिस्थिती चिंताजनक होऊ शकते.

ठाणे शहरातील १६ हाॅटस्पाॅट निश्चित काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्या भागांचा सर्व्हे करून पुढील धोरण निश्चित केले जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार आता हा सर्व्हे झाला असून त्यात ७ प्रभाग समितींमधील १६ हॉटस्पॉट दिसून आले आहेत. त्यानुसार येत्या ३१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन केला आहे.  परंतु, येथील ज्या इमारतीच्या मजल्यावर किंवा झोपडपट्टीच्या एखाद्या भागात रुग्ण आढळला असेल ते स्पॉट मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये आणून तेथे लॉकडाऊन केला जाणार आहे.

कोरोनाचे नवीन २१८ रुग्णकल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत मंगळवारी कोरोनाच्या नवीन २१८ रुग्णांची भर पडली, तर १८३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. नवीन रुग्णांमुळे मनपा हद्दीतील एकूण रुग्णसंख्या ६५ हजार ०७३ झाली असून, यातील ६१ हजार ७२७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, सध्या दोन हजार १३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

टॅग्स :thaneठाणे