शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वालधुनी पूल झाला बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 03:25 IST

तडे गेले : लोखंडी सळया पडल्या उघड्या; वेळीच दुरूस्ती होणे गरजेचे

कल्याण : उल्हासनगर-कल्याण रस्त्यावर वालधुनी नदीवर असलेल्या पुलाला भेगा पडल्या आहेत. तसेच पुलाच्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. या पुलाची देखभाल दुरुस्ती वेळीच न केल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.कल्याण-बदलापूर मार्गावर वालधुनीनजीक कल्याण व उल्हासनगरच्या हद्दीवर वालधुनी नदीवर हा पूल आहे. येथील जुना पूल अरुंद आणि धोकादायक असल्याने तो वाहतुकीसाठी बंद आहे. केवळ नवीन पुलावरून वाहतूक होत असल्याने त्यावर वाहतुकीचा ताण पडत येत आहे. त्यामुळे या पुलावरील काँक्रिट उखडले गेले आहे. पुलाला भेगा पडल्या आहेत. पुलाच्या बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत.

कल्याण-बदलापूर रस्त्याने पुढे कर्जत, पुणे, मुरबाडकडे जाता येते. त्यामुळे तेथे जाणारी वाहने याच पुलावरून जातात. मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्ती कामामुळे वाहतुकीचा ताण कल्याणवर आला आहे. त्यात पत्रीपूल बंद केला असून, तो पाडला जाणार आहे. वालधुनी पुलावरूनही अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळ ठरवून दिली आहे. त्याचा फटका उल्हासनगरच्या हद्दीत पाहायला मिळतो.सध्या सुरू असलेल्या पुलाची अवस्था बिकट असल्याने त्याची देखभाल दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या पुलाचे बांधकाम २००४ मध्ये झाले आहे. जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो बंद आहे. मात्र, तो सुरू असल्यापासूनच नवीन पुलावर वाहने उभी केली जातात.सा.बां. विभागाकडून पुलाच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्षच्जुना पूल सुरू असल्यापासूनच नव्या पुलावर अवजड ट्रक आणि खाजगी बस उभ्या करून ठेवल्या जातात, याकडे आरटीओ कार्यालय व वाहतूक नियंत्रण पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उल्हासनगर शाखेच्या अखत्यारित येतो. या खात्याकडून पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिक व वाहनचालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा