शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

भावलीच्या पाण्यासाठी शहापूरकरांना प्रतीक्षा

By admin | Updated: April 1, 2017 05:50 IST

ठाणे, मुंबईसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठी

ठाणे : ठाणे, मुंबईसह अन्यही शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहापूर तालुक्यात ठिकठिकाणी मोठमोठी जलाशये व धरणे आहेत. मात्र, या तालुक्याला दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या टंचाईवर मात करण्यासाठी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाचे ४.५५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मंत्रालयात बैठकीत घेतल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले. मात्र, भावली पाणीयोजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असली तरी तो दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे शहापुरातील ९७ गावे व २५९ पाड्यांना पाण्यासाठी अजून दोन वर्षे प्रतिक्षा करावी लागणार आहे.पाणी आरक्षित समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. यामुळे या समितीच्या बैठकीत शहापूरच्या पाणीटंचाईवर चर्चा करून भीमनवार यांनी भावली धरणाद्वारे या टंचाईवर मात करणे शक्य असल्याचे पटवून दिले. यामुळे शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईला आता कायमचा पूर्णविराम मिळणार असल्याचे भीमनवार यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात भावली-दारणा नदीच्या उगमस्थानी हे धरण आहे. या धरणाची सुमारे दीड हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता आहे. हे धरण ५९० मीटर उंचीवर असून शहापूर भागातील गावे व पाडे सुमारे २२० ते ५४० मीटर इतक्या उंचीवर आहेत. यामुळे भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने या गावांना पाणीपुरवठा करता येणार आहे. यासाठी विजेचा एक युनिटही खर्च करण्याची आवश्यकता नाही, असा भीमनवार यांचा दावा आहे. या आरक्षित पाण्यातून माणशी ७० लीटर दरडोई प्रत्येक दिवशी पाणी पुरवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ही योजना देखभाल व दुरु स्तीच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी व्यावसायिक पाणीवाटपाचा उद्देश गृहीत धरण्यात आला आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासींना कमी दरात पाणी मिळणार आहे. (प्रतिनिधी)