शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पाणथळींना ‘रामसार’ यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:53 IST

महाराष्ट्रात अनेक पाणथळ जागा आहेत, जिथे किमान २० हजार पक्षी सातत्याने दिसून येतात. त्यांचा अभ्यास करून ती यादी शासनाकडे द्यावी लागते. त्यानंतर रामसार ठरावानुसार त्याची पाहणी केल्यावर त्या जागेला त्या यादीत स्थान मिळते.

ठाणे : महाराष्ट्रात अनेक पाणथळ जागा आहेत, जिथे किमान २० हजार पक्षी सातत्याने दिसून येतात. त्यांचा अभ्यास करून ती यादी शासनाकडे द्यावी लागते. त्यानंतर रामसार ठरावानुसार त्याची पाहणी केल्यावर त्या जागेला त्या यादीत स्थान मिळते. मात्र आपल्याकडील अनेक पाणथळ जागांचे योग्य संवर्धनच झालेले नाही. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झालेले असून, आता यासाठी पक्षीमित्र-संघटनांनी एकत्र येऊन शासनाकडे पत्र देण्याची आणि त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे शास्त्रज्ञ, ज्येष्ठ पक्षीमित्र डॉ. राजू कसंबे यांनी व्यक्त केले.महाराष्टÑ पक्षीमित्र संघटना आणि होपर नेचर ट्रस्ट आयोजित ३१ वे महाराष्टÑ पक्षीमित्र संमेलन गडकरी रंगायतन येथे आयोजिले आहे. या संमेलनाच्या दुसºया दिवशी महाराष्टÑाचे रामसार आणि त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व या विषयावर सत्र रंगले होते. त्यावेळी कसंबे बोलत होते.भारतातील केवळ २६ जागा रामसार यादीत आहेत. नांदूर-मध्यमेश्वर, जायकवाडी, लोणार, उजनी, ठाणे खाडी अशा सुमारे ७ पाणथळ जागा रामसार यादीत याव्या अशी मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी एका नावाला अनुमोदनही मिळाले आहे. यातील ठाणे खाडीसह एखाद दुसºया पाणथळ जागेचे संवर्धन झालेले आहे. मात्र इतर जागांचे योग्य संरक्षण करण्यात आलेले नाही. किमान २० हजार पक्षी तेथे सातत्याने मिळावेत इतकी प्राथमिक अट त्यासाठी आहे. देशातील तर २०० पेक्षाअधिक जागा त्या यादीत बसण्यायोग्य आहेत. त्याचा अभ्यास करण्याची आणि त्या पाणथळ जागांचे संवर्धन करण्याची गरज आहे. एखादी पाणथळ जागा रामसार साईटस् म्हणून घोषित झाल्यावर त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येतनाही, अशी माहिती डॉ. कसंबे यांनी यावेळी दिली.सारस पक्ष्याच्या संवर्धनाबाबत दिली माहितीयाच सत्रादरम्यान गोंदिया जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांनी जिल्ह्यातील सारस आणि त्यांच्या संवर्धनासाठीची मोहिम याविषयी माहिती दिली.मिलिंद गाथाडे यांनी पाय किंवा पंख तुटलेल्या पक्ष्यांवर कसे उपचार केले जातात याची माहिती देऊन पाय तुटलेल्या करकोच्यावर आधारीत चलचित्रफित दाखविली.तर पक्षीमित्र प्रेमसागर मेस्त्री यांनी बर्ड रेस्क्यू या विषयावर माहिती दिली. तसेच पक्ष्यांशी संबंधित इतर काही माहिती पक्षीमित्रांनी दिली. 

टॅग्स :Natureनिसर्ग