शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विकासमंदिर शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:59 IST

एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना शहरातील विकासमंदिर शाळेने डिजिटलकडे झेप घेतली आहे.

सदानंद नाईक उल्हासनगर : एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना शहरातील विकासमंदिर शाळेने डिजिटलकडे झेप घेतली आहे. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करावी लागली आहे. दुपटीपेक्षा जास्त मुले एका तुकडीत आहेत. अधिक शिक्षक देण्याविषयी पाठपुरावा करूनही सरकार देत नसल्याची खंत संस्थेचे अध्यक्ष व्ही.व्ही. पाटील यांनी व्यक्त केली.पाटील यांनी २५ वर्षांपूर्वी विकासमंदिर ही शाळा सुरू केली. गोरगरिबांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी ९० टक्के झोपडपट्टी असलेल्या परिसरात शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विविध उपक्रम राबवले जातात. बालवाडीच्या मुलांकडून बाराखडी, शब्दरचना, १ ते १०० पर्यंत अंक लिहितावाचता येतील, त्याच मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला जातो.बालवाडीत चक्क १९२ मुलांचा पट आहे. तर, पहिलीच्या एका तुकडीत ७५ मुले आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या प्रत्येक तुकडीला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मुले असून माध्यमिक तुकड्यांतील मुलांची संख्याही ७५ पेक्षा जास्त आहे. शहरातील बहुसंख्य शाळांना मुलांअभावी घरघर लागली असताना, विकासमंदिर शाळेत विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी असल्याचे पाटील म्हणाले. मुख्याध्यापक वसुधा डोंगरे, योगेश पाटील यावेळी उपस्थित होते.शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण शाळा डिजिटल करण्याची संकल्पना आहे. शाळेच्या प्रत्येक वर्गात व बाहेर सीसीटीव्ही पाच वर्षांपूर्वी लावले आहेत. विद्यार्थ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी चांगले आहे, त्यांना गणित, विज्ञान इंग्रजीतून शिकवले जाते. जूनमध्येच विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांच्या पाया पडून येण्याची शपथ दिली जाते.>प्रत्येक वर्गात आदर्श विद्यार्थ्यांची निवडशाळेच्या विविध उपक्रमांतील भाग, अभ्यास, वर्तणूक, स्वच्छता आदी निकष लावून प्रत्येक वर्गातून एका विद्यार्थ्याची निवड केली जाते. विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीची नोंद ठेवत त्यांची समस्या शिक्षक, पालकव विद्यार्थी एकत्र येऊन सोडवतात.

टॅग्स :Schoolशाळा