शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलेंडरने कूकची हत्या करणाऱ्या वेटरला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 22:21 IST

चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलेंडर मारून अजित रॉय (३०) या कुकची हत्या करणाºया मंजीतकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेपेची तसेच मोबाईल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देठाणे सत्र न्यायालयाचे आदेशमोबाईल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चायनीज दुकानात काम करताना झालेल्या भांडणाच्या रागातून गॅस सिलेंडर मारून अजित रॉय (३०) या कुकची हत्या करणाºया मंजीतकुमार सरोज (३५) या वेटरला ठाणे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी नुकतीच जन्मठेपेची तसेच मोबाईल चोरीबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावली. चार वर्षापूर्वी भिवंडीतील एका चायनीज दुकानामध्ये हा प्रकार घडला होता.भिवंडीतील पूर्णागावात असलेल्या तंदुरी कॉर्नर आणि चायनीज सेंटर या दुकानात वेटर मंजीतकुमार याच्यासह कुक अजित तसेच अन्य कामगार असे तिघे काम करीत होते. हे सर्व कामगार दुकानातच झोपत असे. कामावरून उद्भवलेल्या वादातून दोघांनी एकमेकांना ५ जुलै २०१७ रोजी रात्री शिवीगाळ केली. यावेळी मालकाने त्यांना समजावल्यानंतर यापुढे आम्ही भांडण करणार असे त्यांनी सांगितले. ६ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर तिघेही कामगार दुकानात झोपले. मालक घरी निघून गेला. परंतु दुसºया दिवशी सकाळी येथील एका पानटपरी चालकाने फोन करून अजितला मार लागल्याची माहिती दिल्यानंतर दुकानमालक आणि त्याचा भाऊ तात्काळ दुकानावर आले. त्यांनी आतमध्ये पाहिले असता, दुकानामध्ये रक्ताच्या थारोळयात अजित पडल्याचे दिसले. त्याच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या शेजारीच रक्त लागलेले गॅस सिलेंडर पडले होते. त्यांनी अजितला नेमके काय झाले याबाबत विचारल्यानंतर मंजीतकुमारने झोपेतच कपाळावर गॅस सिलेंडर मारल्याची त्याने माहिती दिली. सर्वांनी मंजीतकुमारचा शोध घेतला. मात्र तो पसार झाला होता. शिवाय कामगारांची नावे आणि पत्ता लिहिलेली वही तसेच अजित याचा मोबाईल देखील त्याठिकाणी नव्हता. अजितला उपचारासाठी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यु झाला. दुकान मालकाच्या तक्र ारीनंतर उत्तरप्रदेशच्या मंजीतकुमार विरु द्ध नारपोली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. याच खटल्याची सुनावणी न्यायाधीश तांबे यांच्या न्यायालयात ३१ मार्च रोजी झाली. सर्व बाजू पडताळल्यानंतर खून प्रकरणात जन्मठेप तर मोबाईल चोरीसाठी एक वर्षांची शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. वर्षा चंदने यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक पी. एम भालेराव यांनी केला. पोलिस हवालदार एस. एस. जाधव, कॉन्स्टेबल जी. जी. पाचेगावकर, हवालदार एस. पी. जाधव, पोलीस नाईक एस. एस. म्हात्रे यांनीही या खटल्यासाठी तपास अधिकाऱ्यांना मदत केली.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय