शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनच्या ताफ्यातील ९ व्होल्वो बसेस १५ दिवसापासून दुरुस्तीसाठी वागळे आगारात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 17:20 IST

एकीकडे ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध प्रयत्न सुरु असतांना परिवहनच्या बसेस वेळेत दुरुस्त होत नसल्याने त्याचा भुर्दंड परिवहनलाच सोसावा लागत आहे. व्होल्वोच्या ९ बसेस मागील ९ दिवसापासून बंद असून दुरुस्तीसाठी आणखी ८ दिवसांचा कालावधी जाणार आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसात १५ लाखांचे उत्पन्न बुडालेदुरुस्तीसाठी लागणार आणखी आठ दिवस

ठाणे -ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात असणाऱ्या ३० व्होल्वो बसेसपैकी ९ बसेस मागील १५ दिवसापासून वागळे आगारात दुरुस्तीसाठी उभ्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिवसाला परिवहन सेवेचे साधारण एक लाख रुपयांचे नुकसान होत आहे. या बसेस रस्त्यावर उतरण्यास आणखीन आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती परिवहनच्या सुत्रांनी दिली.                   सध्या ठाणे ते बोरीवली या मार्गावरील वातानुकुलीत ही बस सेवा सुरु आहे. यातील एका बसचे सरासरी दिवसाचे उत्पन्न हे १० हजारांच्या आसपास आहे. या मार्गावर २६ वातानुकुलीत बसेस धावतात त्याव्यतिरिक्त ४ व्होल्वो बसेस ठाणे ते मंत्रालय अशा धावत आहेत. ठाणे ते बोरीवली मार्गावर या बसेस वाढवाव्यात अशी या मार्गावरील प्रवाशांची मागणी आहे. परंतु असे असतांना मागील १५ दिवसापासून केवळ २१ बसेसच रस्त्यावर धावत असून उर्वरीत ९ बसेस वागळे आगारात दुरुस्ती उभ्या आहेत. या बसेसपैकी काही बसेसच्या काचा फुटल्या असून काही बसेस सर्व्हीसींगसाठी उभ्या आहेत. परिणामी या बसेस रस्तावर धावत नसल्याचे परिवहनचे दिवसाला सुमारे एक लाखांचे नुकसान होत आहे. त्यानुसार मागील १५ दिवसात जवळपास १५ लाखांचे नुकसान परिवहनला सहन करावे लागले आहे. त्यात या बसेस दुरुस्तीसाठी आणखी ९ दिवस लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त