शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्हीव्हीपॅट मशीन धोकादायक, मनसेकडून राज्य निवडणूक आयोगाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 05:45 IST

मनसेने घेतला आक्षेप : राज्य निवडणूक आयोगाला पाठवले पत्र

कल्याण : राज्य निवडणूक आयोगातर्फे निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. परंतु, त्यावर मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी आक्षेप घेतला आहे. व्हीव्हीपॅट ही यंत्रणा खर्चिक व धोकादायक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. यासंदर्भात आयोगाला पत्र पाठवून शेख यांनी काही सवाल केले आहेत.

सध्या जिल्हास्तरावर निवडणूक आयोगातर्फे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती केली जात आहे. मात्र, व्हीव्हीपॅट ही यंत्रणा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला हे आव्हानच असल्याचे शेख यांनी आयोगाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. सर्व धोक्यापासून ही यंत्रणामुक्त वाटत असलीतरी त्यानंतरच्या प्रक्रिया ज्या निवडणुकांदरम्यान होणार आहेत, त्या अत्यंत धोकादायक वाटत असल्याचे शेख यांचे म्हणणे आहे. कार्यपद्धत व यंत्रणा खर्चिक बाब असून त्यापेक्षा मतपत्रिकांवरील निवडणुका २० टक्के खर्चात झाल्या असत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. याचबरोबर ईव्हीएम मशीनवर चिन्हांच्या प्रतिकिृतीचा कागद लावला जातो परंतु, या चिन्हांचे व्हीव्हीपॅटद्वारा नियंत्रण करायचे झाल्यास या मशीनमध्ये चिन्हांचे लोडिंग कसे करणार, प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळ्या चिन्हांचे लोडिंग होणार का, सिम्बॉल लोडींग निवडणूक आयोगाचे तंत्रज्ञ, करणार की खाजगी तंत्रज्ञ की उत्पादक कंपनी करणार, त्यासाठी सॉप्टवेअर अ‍ॅप्लिकेशन तयार कोण करणार, सिम्बॉल लोडिंग करताना विशिष्ट चिन्हाला आगाऊ १०० ते २०० मते लोड केली जाण्याची शक्यता आहे का, लाखो व्हीव्हीपॅट मशीनमध्ये लोडिंगसाठीची यंत्रणा निवडणूकआयोग, कशी अंमलात आणणार, सिम्बॉल लोडिंगच्या प्रक्रियेचा सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित हवे ही गोष्ट अव्यवहार्य आहे, ती कशी राबविणार, व्हीव्हीपॅटचा वापर गृहीत धरला तरी आयोग या चिन्हांची मोजणी करणार नाही का? त्या चिन्हाचा वापर फक्त चिन्ह पाहण्यासाठी होणार का, चिठ्ठ्या मोजायच्या असल्यास न्यायालयाकडून आदेश घ्यावा लागणार का, त्याची प्रक्रिया कशी होणार, असे सवाल शेख यांनी केले आहेत. आता यावर निवडणूक आयोग काय उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :VVPATव्हीव्हीपीएटीthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका