शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी टीकाकारांना जागा दाखवली - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 03:40 IST

ठाण्याच्या मतदारांनी बोलघेवडेपणापेक्षा काम करणाऱ्या खासदाराला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे जे निवडणुकीपूर्वी टीका करत होते, त्यांनाच त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिल्याची गंभीर टीका ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ठाणे - ठाण्याच्या मतदारांनी बोलघेवडेपणापेक्षा काम करणाऱ्या खासदाराला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे जे निवडणुकीपूर्वी टीका करत होते, त्यांनाच त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिल्याची गंभीर टीका ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांचा विजय दृष्टिपथावर आला असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ही टीका केली. निवडणुकीपूर्वी सुशिक्षित आणि अल्पशिक्षित असा प्रचार केला गेला होता. तशा आशयाचे बॅनरही शहरभर लागले होते. त्यानंतर, आता विचारे यांचा विजय झाल्यानंतर आता मतदारांनीच त्या टीकाकारांना उत्तरे दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या मंडळींनी केवळ टीका करण्याचेच काम राज्यात केले आहे. परंतु, मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हा विजय केलेल्या कामांचा विजय आहे. विकासकामांचा विजय आहे. जनतेने पुन्हा एकदा दाखवलेल्या विश्वासाचा विजय असल्याची प्रतिक्रियासुद्धा त्यांनी दिली.ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चारही लोकसभा मतदारसंघांतील जनतेने युतीच्या उमेदवारांवर विश्वास टाकून पुन्हा काम करण्याची संधी दिली असून त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय, हा विजय शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांचासुद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.मोदींच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांवर दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९