शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी घुसखोरांजवळ आढळली मतदार ओळखपत्रे; ठाणे पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:17 IST

बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या भिवंडीतील दोन महिलांची चौकशी सुरू असताना त्यादेखील बांगलादेशी घुसखोरच असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांना त्यांच्याजवळ मतदार ओळखपत्रांसह इतर कागदपत्रेही आढळली आहेत.

ठाणे : बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या भिवंडीतील दोन महिलांची चौकशी सुरू असताना त्यादेखील बांगलादेशी घुसखोरच असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांना त्यांच्याजवळ मतदार ओळखपत्रांसह इतर कागदपत्रेही आढळली आहेत.चार बांगलादेशी घुसखोर महिलांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली २९ मार्च रोजी कारवाई करण्यात आली होती. साहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाणके, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू महाले आणि महिला कर्मचाºयांच्या पथकाने भिवंडी येथील कन्हेरी रोडवरील हनुमान टेकडी परिसरात छापा टाकून रूमा फारूख शेख, रूकीम जलाल शेख, नजमा कबीर शेख आणि रत्ना हनीफ शेख यांना अटक केली होती.अटक करण्यात आलेल्या चारही महिला या भागात वेश्या व्यवसाय करत होत्या. संगीता मारिम मुल्ला मोहम्मद मुस्तफा सोनू मुल्ला आणि शामसून्नेहल सिराजऊलहक अन्सारी यांनी या चारही महिलांना बेकायदेशीररीत्या आश्रय दिलाहोता. आरोपींच्या तपासात ही माहिती समोर आल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही आश्रयदात्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.१२ एप्रिल रोजी पोलिसांनी संगीता सोनू मुल्ला आणि शामसून्नेहल अन्सारी यांना अटक केली. १८ एप्रिलपर्यंत त्या पोलीस कोठडीत होत्या. चौकशीदरम्यान या दोन्ही महिलादेखील बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांना त्यांच्याजवळ पॅनकार्ड, शिधापत्रिका आणि मतदार ओळखपत्रही आढळले.त्या बºयाच वर्षांपासून भिवंडी येथे अवैधरीत्या वास्तव्यास होत्या. तपासाअंती पोलिसांनी त्यांच्या मोबाइल फोनचे सीडीआर मिळवले असता, त्या त्यांच्या बांगलादेशातील पतीसोबत नियमित संपर्कात असल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या उत्पन्नाचा थोडा वाटा त्या एजंटमार्फत बांगलादेशला पाठवत असल्याची माहितीही तपासातून निष्पन्न झाली आहे. दोन्ही महिला सध्या न्यायालयीन कोठडीत असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.आरोपी महिलांनी भिवंडी येथे जागा विकत घेतली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान तशी माहिती मिळाली आहे. घुसखोरांना अशा प्रकारे जागा विकणे नियमाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्यांना जागा कुणी विकली, याची माहिती घेतली जात असून या प्रकरणामध्ये त्यांचीही चौकशी केली जाणार आहे.- रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग, ठाणे

टॅग्स :thaneठाणे