ठाणे : मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री मतपेट्यांचा घोळ झाल्याचे शहरातील काही भागात दिसून आले. प्रभाग १ मध्ये बंदोबस्ताशिवाय मतपेट्या घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर प्रभाग ३ मध्ये सेंट झेव्हियर्स शाळेतून मतपेट्या घेऊन जाणारी बस शिंदेसेनेच्या उमेदवार उमेदवारांनी रोखून धरली. यामुळे अर्धा तास गोंधळाचे वातावरण होते.
मानपाडा येथील प्रभाग ३ मध्ये गुरुवारी रात्री ईव्हीएम मोजणी केंद्रात घेऊन जात असताना वाहनात अपक्ष उमेदवार असल्याचा आरोप शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच ते वाहन रोखले. यामुळे तणाव निर्माण झाला. अपक्ष उमेदवारांनाही कोंडून ठेवले. तसेच पाऊण तास मतपेट्यांची बस रोखून धरण्यात आली. यावेळी अपक्ष व शिंदेसेनेचे पदाधिकारी यांच्यात वाद झाला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ११ च्या सुमारास येथून बस बाहेर काढली. दुसरीकडे प्रभाग १ मध्ये मतपेट्या बंदोबस्त शिवाय नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
काहींचा मतपेट्या पळवण्याचा प्रयत्न होता, त्याची माहिती मिळाल्यानंतर मी याठिकाणी आले मतपेट्या घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी काहींनी बाहेरची लोकं बोलवली होती, त्यामुळेच आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला, संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे- मीनाक्षी शिंदे, उमेदवार शिंदेसेना
मतपेट्या उशिर होऊनही गेल्या नव्हत्या, त्या का गेल्या नाहीत त्या पाठवून द्याव्यात यासाठी येथे आलो होतो, आणि प्रशासनाबरोबर चर्चा देखील सुरू होती. मात्र आमच्यावर चुकीचा आरोप लावण्यात आला- मधुकर पावशे, अपक्ष उमेदवार
Web Summary : Post-voting, Thane saw unrest. Ward 3 witnessed a bus carrying ballot boxes stopped by Shinde Sena, alleging irregularities and independent candidate involvement, causing a tense standoff before police intervened.
Web Summary : मतदान के बाद, ठाणे में अशांति देखी गई। वार्ड 3 में शिंदे सेना द्वारा मतपेटी ले जा रही एक बस को रोका गया, जिसमें अनियमितताओं और स्वतंत्र उम्मीदवार की भागीदारी का आरोप लगाया गया, जिससे पुलिस के हस्तक्षेप से पहले एक तनावपूर्ण गतिरोध पैदा हो गया।