शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
4
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
5
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
6
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
7
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
8
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
9
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
10
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
11
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
12
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
13
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
14
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
15
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
16
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
17
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
18
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
19
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
20
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?

माणसांच्या कोलाहलात पक्ष्यांचा आवाज लुप्त, दत्ताजी उगावकर यांची खंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:51 IST

गावांचे शहरीकरण आणि शहरांचे महानगरीकरण झपाट्याने होत असून त्यामुळे त्या त्या ठिकाणाच्या पक्ष्यांच्या वसतीस्थानावर परिणाम होत आहे. शहरीकरण पक्ष्यांच्या मूळावर येत आहे. माणसांच्या कोलाहलात पक्ष्यांचा आवाज लुप्त होत आहे.

ठाणे : गावांचे शहरीकरण आणि शहरांचे महानगरीकरण झपाट्याने होत असून त्यामुळे त्या त्या ठिकाणाच्या पक्ष्यांच्या वसतीस्थानावर परिणाम होत आहे. शहरीकरण पक्ष्यांच्या मूळावर येत आहे. माणसांच्या कोलाहलात पक्ष्यांचा आवाज लुप्त होत आहे. पक्ष्यांच्या काही जातींनी या शहरी वातावणाशी जुळवून घेऊन आपली जीवनपद्धतीच बदलली आहे. माणसांच्या सततच्या सहवासामुळे पक्ष्यांची माणसाबद्दलची भीती मात्र कमी होत चालल्याचे आढळून येत आहे, असे मत ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर यांनी शनिवारी व्यक्त केले.होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेतर्फे गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या पक्षिमित्र संमेलनाचे उद््घाटन महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर, प्रमुख अतिथी उल्हास राणे, ‘होप’च्या अध्यक्षा डॉ. दीपा राठी, बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे, महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय परांजपे व अ‍ॅड. माधवी नाईक आदी उपस्थित होते. राठी यांनी प्रास्ताविक केले, तर काटदरे यांनी संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘शेतातील पक्षी’ या ई बुकचे आणि संमेलनाच्या ‘अग्निपंख’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.अध्यक्षीय भाषणात उगावकर म्हणाले, माणसाच्या जवळ जाण्याची लक्ष्मणरेषा पक्ष्यांनी आखून घेतल्याचे आढळते. निरनिराळ््या प्रजातीमध्ये ती निरनिराळी असू शकते. उदा. पारवे किंवा कबुतरे जास्त जवळीक साधतात. सर्वसामान्यपणे ज्या पक्षिजाती शहरी पर्यावरणाशी जुळवून घेतात, त्या सर्वसाधारणपणे मोठ्या आकाराच्या व म्हणूनच मोठ्या मेंदूच्या असतात. हे मोठ्या आकाराचे पक्षी माणसाच्या जास्त जवळ जातात, त्याचा मेंदू आकाराने मोठा असल्याने ते जास्त धोका पत्करु शकतात. पक्ष्यांच्या सान्निध्याचा मानवी जीवनावर विपरित परिणाम अद्यापपर्यंत आढळून आला नसला, तरी बर्ड फ्ल्यू किंवा कबुतरांच्या अस्तित्वामुळे उद््भवणारे श्वसनाचे आजार याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.महाराष्ट्राच्या समुद्रकिनाºयावर मोठ्या संख्येने येणाºया स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश पाणपक्ष्यांच्या गणनेत झालेला दिसत नाही. या गणनेस महाराष्ट्रातून अल्प प्रतिसाद मिळाला. आता आयबीएनच्या माध्यमातून पाणपक्षी गणनेला चालना मिळाली आहे. महाराष्ट्रातील २८ ठिकाणे ही आयबीएनच्या यादीत आहेत. जानेवारी २०१७ मध्ये केलेल्या पक्षीगणनेस अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला होता. भारतात अनेक राज्यात अशी गणना करण्यात येत असली, तरी यातील महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. परंतु, स्वतंत्ररित्या महाराष्ट्रातील गणनेची आकडेवारी व पाणथळीतील पक्ष्यांची यादी एकत्रितपणे संकलित केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जलाशयावर येणाºया पाणपक्ष्यांची प्रजातीनुसार संख्या उपलब्ध नाही. जानेवारी २०१८ च्या गणनेपासून स्वतंत्ररित्या महाराष्ट्रातील गणनेचे एकत्रितपणे संकलन व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक पक्षिमित्रांनी आपल्या भागातील पाणथळीबाबत संशोधन करून डाटा तयार करावा. कित्येक ठिकाणच्या पाणथळ जागा आकसत चालल्या आहेत. जायकवाडी, उजनी, हतनूर यासारखे मोठे जलाशय सोडले तर शहरातील तलाव, छोटी धरणे, पाझर तलाव इत्यादी ठिकाणी अतिक्रमणे वाढत आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी होणारा उपसा, त्याचबरोबर जलपर्णी, बेशरमी, रामबाण यांसारख्या वनस्पतीचे आक्रमण वाढत असल्याने जलपृष्ठ क्षेत्र कमी होत आहे. परिणामी, पक्ष्यांना भक्ष्यांचा तुटवडा जाणवतो. छोटी धरणे, पाझर तलाव, शहरातील तलाव या पाणथळीच्या जलाशयामध्ये नैसर्गिक पक्षी अधिवास संरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.त्यानंतर डॉ. आपटे यांनी ‘गिधाड संवर्धन’ विषयावर सादरीकरण केले. त्यानंतर ब्रिटनमधून आलेल्या रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन आॅफ बर्डसचे अधिकारी आयन बार्बर, पॉल इन्शुआकाओ जगातील विविध पक्ष्यांची माहिती देणारे सादरीकरण केले. संबंधित वृत्त/३वेगवेगळ््या कारणांनी जखमी होणाºया पक्ष्यांच्या समस्येला गेले काही दिवस पक्षिमित्रांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. जखमी पक्ष्यांची सुटका व त्याच्यावर उपचार ही समस्या त्यांना भेडसावत आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी पक्ष्यांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे. परंतु, ग्रामीण भागातील पक्षिमित्रांना उपचारांबाबत अनेक अडचणी येतात.जखमी पक्षी बरा होण्यास दोन ते तीन दिवस लागत असतील, तर त्याच्या भक्ष्याची सोय करावी लागते. प्रत्येक प्रजातीची गरज भिन्न असल्याने तशी व्यवस्था करावी लागते. शिवाय वेळेवर योग्य उपचार व आहार न मिळाल्यास पक्षी मरण्याची शक्यता जास्त असते.या समस्येविषयी नाशिक पक्षीमित्र मंडळ व स्थानिक पक्षीमित्रांनी चिफ कॉन्झर्वेटर आॅफ फॉरेस्टच्या भेटीत ठिकठिकाणी रेस्क्यू सेंटर उभारण्यात मान्यता मिळाली आहे. पक्षिमित्रांनी स्थानिक वनविभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून याबाबतची कार्यवाही करुन घ्यावी.जखमी पक्ष्यांना प्राथमिक उपचार त्वरित मिळावेत, यासाठी अशा उपचारांची माहिती देणारी व त्यासाठी लागणाºया औषधांची नावे असलेली पुस्तिका प्रकाशित करावी आणि तशी चर्चाही मागील संमेलनात झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली. महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या पक्षिमित्रांची आणि त्यांच्या संस्थांची सूची-फोन नंबरसहीत तयार केल्यास एकमेकांशी संपर्क करणे सोयीस्कर होईल, असे उगावकर यांनी सुचवले.

टॅग्स :thaneठाणे