शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

व्हीआयपींना थेट दर्शन : भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 2:00 AM

व्हीआयपींना थेट दर्शन : महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांच्या पदरी निराशा

पंकज पाटील 

अंबरनाथ : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात येतात. मात्र, गेल्या वर्षीपासून मंदिरगाभाºयात प्रवेश करून दर्शन घेण्यास केलेली बंदी यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. या बंदीमुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवित्र दिवशीच महादेवाचे दर्शन मिळत नसल्याने रांगेत उभे राहण्याचा अर्थच काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे व्हीआयपी लोकांना थेट गाभाºयात पाठविण्यात येत असल्याने त्यालादेखील विरोध होत आहे. एकच नियम प्रत्येकाला लावावा, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. रांगेत तासन्तास उभे राहून महादेवाचे दर्शन मिळाल्यावर त्यांच्या चेहºयावर समाधान दिसते. मात्र, गेल्यावर्षीपासून भाविकांना मंदिरगाभाºयातच प्रवेश दिला जात नाही. रांगेतील भाविकांना गाभाºयाबाहेरूनच दर्शन घेण्यास सांगण्यात येत आहे. गाभारा लहान असल्याने आत प्रवेश करून दर्शन घेतल्यास स्वाभाविकच विलंब होतो. त्यातच, रांग मोठी असल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून गाभाºयात जाण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता गाभाºयाबाहेरूनच दर्शन घेण्यात येणार आहे. गाभाºयात प्रवेश मिळत नसल्याने दर्शनाची रांग लहान होत असली तरी, अनेक भाविक महादेवाच्या दर्शनापासून वंचित राहतात. महाशिवरात्रीलाही दर्शन मिळत नसेल तर, रांगेत उभे राहण्यात अर्थच काय, अशी प्रतिक्रिया भाविक व्यक्त करत आहेत.गाभाºयात बंदी घालण्यासाठी झालेल्या बैठकीत मंदिराच्या पुजारी कुटुंबाने विरोध दर्शवला होता. भाविक मोठ्या श्रद्धेने या मंदिरात येतात. त्यांना महादेवाचे दर्शन गाभाºयात न मिळाल्यास ते बाहेर आल्यावर संताप व्यक्त करतात. अनेक भाविकांना गाभाºयात पाठविले जात नसल्याची पूर्वकल्पनाच नसते. गाभाºयाजवळ आल्यावर त्यांना तेथूनच बाहेरचा रस्ता दाखविण्यात येतो. पोलीस प्रशासनावर ताण पडत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मंदिर पुजारी सांगत आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि रांगेत होणारा त्रास कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पोलीस प्रशासन सांगत आहे.भोंगे आणि पिपाण्यांवरध्वनिप्रदूषणामुळे बंदीजत्रेत फिरताना अनेकजण भोंगे आणि पिपाण्या जोरजोरात वाजवतात. त्याचा त्रास इतरांना होत असल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी भोंगे आणि पिपाण्या वाजवण्यावरही बंदी घातली आहे. ध्वनिप्रदूषणाचे कारण पुढे करून हा निर्णय घेण्यात आला आहे. जत्रेत प्लास्टिकबंदीबाबतही निर्णय घेण्यात आला असून, याप्रकरणी कारवाई करण्यातयेणार आहे.महाशिवरात्रीला महादेवाचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते. मात्र, दर्शन लांबून होत असेल, तर त्या दर्शनाला अर्थ नाही. भाविकांचे समाधान करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. त्यामुळे गाभारा भाविकांना खुला करावा.- शुभांगी सकपाळ, अंबरनाथगाभाºयातील दर्शन बंद केल्याने अनेक भाविकांनी दर्शन न घेणेच पसंत केले आहे. गाभाºयात जाताच येणार नसेल तर त्या दर्शनाला काय अर्थ, असा निष्कर्ष काढून अनेक भाविक केवळ जत्रेचा आनंद घेतात. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास रांगेतील भाविकच कमी होतील. पोलिसांच्या या निर्णयामुळे दर्शनाचे महत्त्व संपून, भाविक दुसºया मंदिराकडे वळतील.- तुषार जाधव, अंबरनाथ

टॅग्स :ambernathअंबरनाथ