शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन महालक्ष्मी : माणुसकीचे घडले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:48 IST

ऑपरेशन महालक्ष्मी : स्थानिक ग्रामस्थांचा मदतकार्यात मोठा वाटा

अंबरनाथ : महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलेले असले तरी या मदतकार्यात सर्वात मोठा सहभाग हा स्थानिक ग्रामस्थांचा होता. चामटोली आणि कासगावातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत पथकाला सहकार्य केले. स्थानिकांच्या मदतीमुळे कमी वेळेत सर्व प्रवाशांना बाहेर काढणे शक्य झाले. या मदतकार्यात केवळ मदतीचे नव्हे तर माणुसकीचे दर्शन घडले.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना सर्वात आधी मदत पोहचवण्याचे काम स्थानिक ग्रामस्थांनीच केले. प्रवाशांना बिस्कीट आणि पाणी पोहचवल्यानंतर त्यांच्या सुखरुप सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. एनडीआरएफ आणि नौदलाचे जवान मदतकार्य करत असतांना ग्रामस्थांनी सुखरुप बाहेर आलेल्या प्रवाशांना सुरक्षितस्थळी पोहचवण्याची जबाबदारी घेतली. स्थानिक पोलीस आणि सेवाभावी संस्थेचे पदाधिकारीही या कामात होते. चामटोली आणि कासगावच्या मैदानावर प्रवाशांना सुखरुप सोडल्यावर या प्रवाशांच्या बॅग आणि त्यांचे सामान डोक्यावर घेऊन स्थानिक ग्रामस्थांनी डोंगर दऱ्यातील ३ किलोमीटरचे अंतर पार केले. सामान घेऊन डोंगर चढणे प्रवाशांना शक्य होणार नाही याची कल्पना असल्याने ग्रामस्थांनी त्यासठी पुढाकार घेतला. काही तरुणांनी वृध्द आणि आजारी व्यक्तींना आधार देत चामटोली गावात आणले. कासगांव ते चामटोली हे अंतर डोंगरावरील असल्याने आधीच थकलेल्या प्रवाशांना पुन्हा डोंगर चढून चामटोली गावात येणे शक्य नव्हते. मात्र चिखलातून रस्ता काढत प्रवाशांना सह्याद्री हॉलमध्ये सुरक्षित आणण्यात आले. काही ठिकाणी प्रवाशांना आपले सामानही घेऊन चढणे शक्य होत नव्हते, अशा वेळी सह प्रवाशांनीही त्यांना मदत केली. एकमेकांना साथ देत प्रवासी या धोक्यातून बाहेर पडले.कासगावच्या डोंगरावरुन चढून चामटोलीत आलेल्या प्रवाशांना आराम करण्यासाठी आणि बसण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरांमध्ये आसनव्यवस्था केली होती. चामटोली गावातील ग्रामस्थांनी माणुसकी दाखवत प्रत्येक प्रवाशाला पाण्याची, चहाची आणि बिस्कीटची सोय केली होती. काहींनी या प्रवाशांसाठी खिचडीची सोय केली होती. प्रत्येक ग्रामस्थ आपआपल्यापरीने प्रवाशांची सोय करत होते. काही महिलांनी घाबरलेल्या महिलांचे मनोबल वाढवण्याचे कामही केले. त्यांना धीर देत मदत कक्षापर्यंत नेले.मदतकार्यात स्थानिक ग्रामस्थांसोबत बदलापूर शहरातील राजकीय पुढारीही सहभागी झाले होते. खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियेश जाधव, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी आणि त्यांची सर्व टीम या मदतकार्यात सहभागी झाली होती. आजारी महिलांना आणि वृध्दांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.मदतीसाठी येणाºया गाड्यांना कोंडीचा फटकावाहतुकीचा खोळंबाएकीकडे मदतकार्य सुरू असताना दुसरीडके रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रस्त्यांवर खाजगी वाहने वाढल्याने मदत कार्यासाठी येणाºया गाड्या आणि बस या अडकून पडत होत्या. त्यांना पुन्हा घटनास्थळी नेण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती.मोठ्या संख्येने गाड्या रस्त्यावरमदत कार्यासाठी गाड्यांचा ताफा मोठ्या प्रमाणात आल्याने चामटोलीतील सर्वच रस्ते गाड्यांनी भरले होते. त्यामुळे वाहने बाहेर काढणे चालकांना अवघड जात होते. खाजगी वाहनांवर बंदी घालण्याचा वाहतूक पोलिसांचा मात्र प्रयत्न अपयशी ठरला. 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ