शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुकट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 
2
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
3
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
4
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
5
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
6
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
7
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
8
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
9
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
10
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
11
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
12
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
13
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
14
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
15
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
16
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
17
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
18
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
19
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
20
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत

गावांनी संगोपन केले... वृक्ष वाढले, जंगल बहरले

By admin | Updated: December 24, 2015 01:35 IST

सध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते

राजेश जाधव,  म्हारळसध्याच्या स्थितीत प्रदूषणाने पर्यावरणात आमूलाग्र बदल घडत असल्याचे आपण अनुभवत आहोत. अवकाळी पाऊस पडणे, हे सध्याचेच उदाहरण आपणासमोर येते. असंख्य वाहनांची रेलचेल, बांधकामे, रासायनिक कंपन्या अशा अनेक कारणांमुळे हवेतील प्रदूषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. उघड्या माथ्याचे डोंगर आता भरू लागले आहेत. संरक्षित जंगले आता घनदाट होऊ लागली आहेत. त्याचे कारण म्हणजे या भागात ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाविषयी आलेली जागरूकता आणि वन विभागाने ग्रामस्थांवरच जंगले वाचविण्यासाठी दिलेली जबाबदारी.कल्याण तालुक्यात जळवपास सहा हजार हेक्टर जमीन वन विभागाकडे आहे. त्यामध्ये वृक्षलागवडीसारखे उपक्रम राबविले जात आहेत. वनविभागाने वृक्षलागवड केली तर ती झाडे ग्रामस्थांनी जगवायची, त्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या बनविल्या असून त्यामध्ये गावकऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रात जवळपास १४ हजार गावे जंगलाला लागून आहेत. त्यामुळे जंगलतोडीपासून परावृत्त करण्यासाठी वनविभागाकडून ग्रामस्थांना मदतरूपी गॅसवाटपही करण्यात येत आहे. तालुक्यातील जंगलात ६० ते ७० टक्के वाढ झाली असून यात साग, पाईन, बांबू आणि इतर वृक्षांचा समावेश आहे.आग लागल्यानंतर वणवा जास्त पसरू नये, त्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत जाळरेषा तयार करून आता आटोक्यात आणण्याचा वन विभाग प्रयत्न करतो आहे. जंगल वाढण्याचे दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे जंगलतोड जवळपास ९० टक्के संपुष्टात आली आहे. ग्रामीण भागामध्ये जळणाच्या फाट्यासाठी बैलगाडीसाठी आणि नांगरासाठी प्रामुख्याने जंगलतोड होत होती. पण, आता चुलीच्या ठिकाणी गॅस आल्याने फाट्यासाठी जंगल तोडणे बंद झाले आहे. बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बैलगाडीचे प्रमाणही अत्यल्प झाले आहे. घरटी एक नांगर म्हणजे जवळपास ४ ते ५ झाडे नांगर बनविण्यासाठी शेतकऱ्यास लागत. आता मात्र त्या ठिकाणी नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होऊ लागल्याने त्याच्यासाठी होणारी जंगलतोडही थांबली आहे. त्याच्या परिणामामुळे जिकडे पाहावे तिकडे हिरवाई दिसू लागली आहे. हा पर्यावरणासाठी शुभसंकेत म्हणावा लागेल.