शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील गावांना गावठाणांचा दर्जा, मुख्यमंत्र्यांचे एमएमआरडीएला कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 03:01 IST

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील गावांना लवकरच एमएमआरडीएकडून दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशान्वये एमएमआरडीएला अंबरनाथ पालिका हद्दीतील गावांना गावठाण दर्जा देण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील गावांना लवकरच एमएमआरडीएकडून दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशान्वये एमएमआरडीएला अंबरनाथ पालिका हद्दीतील गावांना गावठाण दर्जा देण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच अंबरनाथमधील गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.झपाट्याने वाढणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका हद्दीत अनेक गावांचा समावेश आहे. यात कानसईगाव, मोरिवलीपाडा, मोरिवलीगाव, जांभिवली, जावसई, ठाकूरपाडा, फणसीपाडा, कोहोजगाव, चिखलोली ठाकूरवाडी, वांद्रेपाडा, अंबरनाथगाव, अंबरनाथपाडा, पालेगाव आदी गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांना गावठाणांचा दर्जा अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्या नियमानुसार बांधकाम आणि विकासासाठी एक चटई निर्देशांक मिळत होता. गावांची वाढणारी हद्द आणि त्यांच्या आसपास वेगाने होणारा विकास पाहता त्या ठिकाणी पूरक चटई निर्देशांक मिळणे आवश्यक असते. त्यासाठी गावठाण दर्जा महत्त्वाचा असतो. मात्र, अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील १२ गावांना गावठाणांचा दर्जा मिळाला नव्हता. त्याचा परिणाम विकासावर होत होता. त्यासाठी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शासनाकडे मागणी केली होती.संपूर्ण प्रक्रि या झाल्यानंतर तो प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. त्यावर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर, नगरविकास विभागाच्या कार्यासन अधिकाºयांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिलेआहे.त्यानुसार, भूमापन नकाशे, कागदपत्रे आणि गुणवत्ता तपासून कलम ३७ अन्वये कारवाई पूर्ण करण्यासाठी हालचाली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या अहवालानंतर याबाबत नगरविकास विभागाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. अनेक गृहसंकुलेही उभी राहत आहेत.दोन चटई निर्देशांक मिळणारगावठाणाचा दर्जा मिळाल्यास या गावांच्या आसपासच्या ५०० मीटरच्या परिघाच्या आतील बांधकामांना दोन चटई निर्देशांक मिळणार आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळण्याची आशा आहे.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएnewsबातम्या