शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदर गावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थ भयभीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 02:43 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर गावात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर गावात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ग्रामस्थ तथा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी संजय गांधी राष्टÑीय उद्यान, बोरिवली आणि नागपूर वनविभागाला पत्रव्यवहार केला असून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेजवळच घोडबंदर गाव असल्याने येथे बिबट्यांचा वावर असल्याचे अनेकदा समोर आले आहे. काही दिवसांपासून बछड्यांसह बिबट्यांची संख्या वाढल्याने गावात त्यांचा वावरही वाढल्याचे ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून निदर्शनास आले आहे. हे बिबटे पूर्वी रात्रीच्या वेळी गावात येत असत.आता मात्र ते अनेकदा संध्याकाळीच गावात दिसत असल्याचे अनेकांनी सांगितले. याची तातडीने दखल घेत उपमहापौरांनी १९ सप्टेंबर रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक तसेच नागपूर येथील वनविभागाला पत्रव्यवहार करत गावात फिरणाºया बिबट्याला जेरबंद करण्याची विनंती केली आहे.बिबट्यांचा वावर मुख्यत्वे दत्त मंदिर, मॉडर्न कंपनी वसाहत, साईनाथ सेवानगर, नेहरूनगर, घोडबंदर किल्ल्यालगतचे एमटीडीसी रेस्ट हाउस आणि बामणदेव नागरी वस्त्यांत बिबट्या अनेकदा फिरताना आढळल्याचे त्यांनी म्हटलेआहे.बिबटे घोडबंदर किल्ला परिसरात आश्रयाला असल्याचा अंदाज आहे. त्या परिसराला लागूनच अनेक घरे असल्याने तेथील लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या बिबट्यांना त्वरित जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याMira Bhayanderमीरा-भाईंदर