शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेसच्या गटनेतेपदी विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती, यासिन कुरेशी यांची अवघ्या एका वर्षातच उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 17:52 IST

अवघ्या एका वर्षाच्या आतच कॉंग्रेसच्या गटनेतेपदावरुन यासिन कुरेशी यांची उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी आता विक्रांत चव्हाण यांची नियुक्त झाली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेशाी सलगी भोवलीस्थायी समितीवर होणार परिणाम

ठाणे - स्थायी समितीसाठी शिवसेनेला टाळी देण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचे गटनेते यासिन कुरेशी यांना चांगलेच महागात पडले आहे. अखेर अवघ्या एका वर्षातच कुरेशी यांची गटनेतेपदावरुन उचलबांगडी झाली असून त्यांच्या जागी आता विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला हाताशी घेऊन स्थायीचे गणिते जळवु पाहणाऱ्या शिवसेनेला देखील हा धक्का बसला आहे.         ठाणे महापालिकेत इतिहासात प्रथमच शिवसेनेने एक हाती सत्ता संपादीत केली. परंतु स्थायीचे गणिते जुळविण्यासाठी त्यांना कुबड्यांची मदत घ्यावी लागली होती. भाजपाने हात वर केल्याने सुरुवातीला शिवसेनेने स्थायी समितीची गणिते जुळविण्यासाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी देखील झाला होता. कॉंग्रेसचे गटनेते यासिन कुरेशी यांनी स्थायीसाठी शिवसेनेला पाठींबा देण्याचे पत्र दिले होते. परंतु कॉंग्रेसच्या इतर दोन नगरसेवकांनी हा पाठींबा चुकीचा असल्याचे सांगत तो न देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतरही शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. अखेर त्यांनी देखील स्थायीचा नाद सोडून दिला. एकीकडे कॉंग्रेसने माघार घेतली आणि दुसरीकडे पाठींबा देण्यास तयार नसल्याने शिवसेनेने सुध्दा स्थायीचा हट्ट सोडला होता. त्यानंतर नव्या आर्थिक वर्षात पुन्हा स्थायी समितीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. परंतु या हालचालींना पुन्हा एकदा ब्रेक लागल्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. शिवसेनेला टाळी देणे यासिन कुरेशी यांना महागात पडले असून त्यांची अवघ्या एका वर्षातच गटनेतेपदावरुन गच्छंती झाली आहे. त्यांच्या जागी आता नगरसेवक विक्रांत चव्हाण यांची नियुक्त पक्षाने केली आहे. त्यामुळे आता स्थायी समितीची गणिते देखील बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcongressकाँग्रेस