शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडची राष्ट्रीय पेयजल योजना दोन वर्षांपासून बंद, ७३.४९ लाखांची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 01:28 IST

Vikramgad : वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदीमधून ७३.४९ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित ती करून राबविण्यात आली.

- संजय नेवे 

विक्रमगड : तालुक्यातील वेहेलपाडा ग्रामपंचायतींतर्गत पाटीलपाडा, कासपाडा, कलमपाडा, अलीवपाडा, पासोडीपाडा, तळ्याचापाडा येथील जवळपास अडीच हजार लोकवस्तीकरिता राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ७३ लाख ४९ हजार ३९० रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र, ही योजना गेल्या दोन वर्षांपासून बंद  असल्याने येथील जनतेला पाण्यासाठी अजूनही वणवण भटकावे लागत आहे.वेहेलपाडा ग्रामपंचायतीमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने सन २०१३-१४ मधील आर्थिक तरतुदीमधून ७३.४९ लाखांची नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित ती करून राबविण्यात आली. यात योजनेतील अंदाजपत्रकात नवीन विहीर, पंपगृह, पंम्पिंग यंत्रसामग्री, ऊर्ध्ववाहिनी, उंच पाणी साठवणूक टाकी, वितरण वाहिनी, शुद्धीकरण व्यवस्था व विद्युत जोडणी करणे अपेक्षित होते. या योजनेकरता  जलस्रोत बघून नवीन विहीर बांधकाम न करता  सन २००४-०५  जलस्वराज्य प्रकल्पामधून बांधण्यात आलेल्या विहिरीमधून पाणीपुरवठा करण्यात येतो.  २०१५ मध्ये कार्यादेश देण्यात आले होते; परंतु  सन २०१८ मध्ये हे काम  पूर्ण करण्यात आले. थोडेच दिवस येथील जनतेला पाणी मिळाले. नंतर ही पाणीपुरवठा योजना बंद पडून आहे. ग्रामस्थांनी वारंवार पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही गेली दोन वर्षे उलटून गेली तरीही येथील कासपाडा, पाटीलपाडा, कलमपाडा, अलीवपाडा, तळ्याचापाडा या अडीच  हजार लोकवस्तीला  या योजनेतील नळ पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळत नाही. 

ही योजना विद्युत बिलाच्या थकबाकीमुळे बंद आहे. ग्रामपंचायतीला हा विषय सोडवण्यासाठी सूचित केले असून, काही पाडे हे जास्त अंतरावर आहेत. त्या पाड्यांकरिता त्यांच्या शेजारील विहिरीमधून मिनी नळ योजनेची अंमलबजावणी करून पाण्याचा प्रश्न लवकरच सोडविण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभाग करत आहे.  - राजेश पाध्ये, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, वाडा-विक्रमगड

राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ७३.४९ लाख खर्च करूनसुद्धा येथील लोकांना पाणी मिळत नाही. या योजनेकरता जलस्रोत बघून नवीन विहीर बांधणे बंधनकारक असताना ठेकेदाराने २००४-०५ साली जलस्वराज्य प्रकल्प योजनेतून बांधलेल्या विहिरीत विद्युत पंप बसविले आहेत. हे पाणी लवकरच कमी होते. या योजनेकरता नवीन जलस्रोत बघून सर्व पाड्यांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी.  -विश्वनाथ गहला, ग्रामस्थ, वेहलपाडा ग्रामपंचायत 

टॅग्स :palgharपालघर