शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उल्हासनगरच्या महापौरपदासाठी विजय पाटील यांच्या नावाचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:46 IST

ओमी कलानी यांची अप्रत्यक्ष अट; आघाडीत राहण्याचा दिला इशारा

- सदानंद नाईकउल्हासनगर : भाजपचे नगरसेवक विजय पाटील यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित करा, तर महापालिकेत भाजप-ओमी टीम, साई पक्षाची आघाडी कायम राहील, असे संकेत ओमी कलानी यांनी दिले आहेत. तर साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी भाजपच्या वरिष्ठांनी शब्द पाळून महापौरपद देण्याची मागणी केली आहे. यामुळे भाजपसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.उल्हासनगर महापालिका महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला आहे. सोमवारी १८ नोव्हेंबरला अर्ज भरण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी न दिल्याने ओमी कलानी टीम नाराज होती. विधानसभा निवडणुकीत भाजपशी फारकत घेऊ न ज्योती कलानी यांना निवडणूक रिंगणात उतवले. महापौर निवडणुकीत महापालिकेतील भाजप-ओमी टीम आणि साई पक्षाची आघाडीपूर्वी इतकीच मजबूत असल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व आमदार कुमार आयलानी व युवानेता मनोज लासी यांनी दिली. भाजप-ओमी टीमचे ३१, कलानी समर्थक-१ व साई पक्षाचे-११ असे एकूण ४३ नगरसेवक आहेत.बहुमतासाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. इतर पक्षाचे एकूण सहा नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे संकेत मनोज लासी यांनी दिल्याने भाजप-ओमी टीम व साई पक्षाचा महापौर निवडून येण्याची शक्यता आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी महापौर अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतली. भाजप-ओमी टीम आणि साई पक्षातील नाराज कोणते नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे महापालिकेप्रमाणे उल्हासनगरमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचा महापौर, उपमहापौर निवडून येण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.शिवसेनेचे एकूण २५ तर रिपाइं ३, राष्ट्रवादी ४ तर भारिप, पीआरपी व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे ३५ नगरसेवक आघाडीकडे आहेत. साई व भाजपातील ओमी टीमचे नगरसेवक खेचण्यासाठी शिवसेनेने जाळे टाकल्याची चर्चा शहरात रंगली आहे. साई पक्षाचे जीवन इदनानी व ओमी टीमचे ओमी कलानी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कोअर कमिटीकडून चार नावांवर शिक्कामोर्तबशहर कोअर कमिटीने विजय पाटील, जमनुदास पुरस्वानी, डॉ. प्रकाश नाथानी व महेश सुखरामानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. चारही नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवली आहेत. विजय पाटील यांना उमेदवारी दिली, तरच महापौर निवडणुकीत आघाडी कायम राहील, अशी भूमिका ओमी कलानी यांनीघेतली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर