शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

Video : श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 16:19 IST

सरकारच्या वन कायद्याचा मसूदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी (4 जून) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसरकारच्या वन कायद्याचा मसूदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. श्रमजीवीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.जंगलातील आंबा, जांभूळ, करवंद घेऊन महिला सहभागी झाल्या.

ठाणे - सरकारच्या वन कायद्याचा मसूदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी (4 जून) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये श्रमजीवीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सन 2019 चा भारतीय वन कायदा सुधारणा हे विधेयक रद्द करावे अशी मागणीच निवेदन देण्यात येणार आहे.  दुपारी बारा वाजता ठाण्यातील साकेत येथून हजारे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच आदिवासींनी आपली पांरपांरिक वेशभूषा करून यामध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी जंगलातील रानमेवा, आंबा, जांभूळ, करवंद घेऊन महिला सहभागी झाल्या आहेत.

केंद्र सरकारने जागतिक तापमान वाढीच्या नावाखाली जंगलातील आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा सुधारित वन कायदा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भारतीय वन कायदा (सुधारणा )-2019 हे विधायक जाहीर केले आहे. सरकारच्या पर्यावरण, वन  व पर्यावरणातील बदल मंत्रालयाच्या वतीने वन कायद्याचे विधेयक जारी करण्यात आले असून सरकारचा हा वन कायदा म्हणजे आदिवासी व पारंपारिक वननिवासी यांच्या परंपरागत वन हक्कांवर आणलेली गदा आणल्याची माहिती श्रमजीवी संघटनेने दिली आहे. 

श्रमजीवी संघटनेच्या उपाध्यक्षा आराध्या पंडित यांनी आपल्या उपजीविकेसाठी जंगलावर निर्भर असलेल्या आदिवासींच्या हातातून काढून घेऊन वनक्षेत्र वाढविण्याच्या नावाखाली बड्या भांडवलदाराना कॅशक्रॉपची वन शेती करता यावी यासाठी रान मोकळे करण्यासाठीचे धोरण सरकार अवलंबू पाहत असल्याचं म्हटलं आहे. आदिवासी व पारंपारिक वननिवासींच्या हिताच्या विरोधी भूमिका घेत आहेत. व्यापारी उत्तेजन देणाऱ्या वनअधिकाऱ्यांना अमर्यादा अधिकार देऊन आदिवासींचे वन हक्क डावलू पाहणाऱ्या ग्रामसभेचे अधिकार कमी करुन ग्रामवनांची समांतर पद्धत आणू पाहणाऱ्या सरकारच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करत आहे. असा जुलमी कायदा श्रमजीवी संघटना कदापी होऊ देणार नाही अशी भूमिका आराध्या पंडित यांनी मांडली आहे. आज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणे