शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना गटनेत्याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 21:22 IST

दीपिका अरोरा यांनी अपशब्द वापरल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचा अर्वाच्च शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मीरा रोड - भर महासभेत भाजपा नगरसेविका दीपिका अरोरा यांनी अपशब्द वापरल्याची घटना ताजी असतानाच आता शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचा अर्वाच्च शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाईंदर पूर्वेला काशीनगर भागात एका अनधिकृत गॅरेज शेडवर पालिका कारवाई करत असताना गॅरेज चालकास आमगावकर यांनी शिवीगाळ केली.काशीनगर भागात असलेल्या एका खासगी भूखंडावर महावीर जैन हे गॅरेज चालवतात. गॅरेज चालक जैन यांचा मूळ जमीन मालकाशी वाद सुरू आहे. जैन यांचे म्हणणे आहे की, जमीन मालकाने सदर जमीन २०१० साली भाडेतत्त्वावर दिली होती. पण नंतर २५ लाखांत खरेदी व्यव्हार ठरला व १५ लाख मालकास दिले. तसेच खरेदीखत व जमीन नावावर करून दिल्यावर उर्वरित १० लाख देणार असे ठरल्याचा दावा जैन यांनी केला. तर मूळ मालकाने मात्र असा कोणताच व्यवहार झाला नसून जैन यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आपल्या जमिनीवर कब्जा केल्याचे जमीन मालकाचे म्हणणे आहे.सदर वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. तर सदर गॅरेज शेड अनधिकृत असल्याने मंगळवारी महापालिकेने त्यावर कारवाई चालवली होती. त्यावेळी आमगावकर तेथे असताना जैन सोबत बोलाचाली होऊन अर्वाच्च शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. जमीन मालकाच्या वतीने आमगावकर कारवाई करायला लावत असल्याचे जैन यांचे म्हणणे आहे.मी तिकडून जात असताना कारवाई होत असल्याने थांबलो. एक तर अनधिकृत शेड दुसरायाच्या जागेत बांधायची. त्यात घाण करत रहिवाशांना त्रास द्यायचा. वरुन जैन हे मला ओळखत असताना ही त्यांनी मुद्दाम माझ्याशी गैरवर्तन केल्याने आपण शिवी दिल्याचे आमगावकर यांनी मान्य केले. नुकतीच गुरुवारी महापालिकेची महासभा झाली असताना भर महासभेत भाजपाच्या दीपिका अरोरा यांनी अपशब्द वापरल्याने टीकेची झोड उठली आहे. चूक कळताच अरोरा यांनी माफी देखील मागितली.