शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचा विजय; ठाण्यात भाजपने दिला नारा

By अजित मांडके | Updated: August 4, 2024 00:11 IST

भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची शनिवारी सायंकाळी महत्वपूर्ण बैठक पार पडली.

अजित मांडके (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विरोधक केवळ नरेटीव्ह सेट करीत आहेत, त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असे सांगतानाच आगामी विधानसभा निवडणुक भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुतीला राज्यात विजय संपादित करायचा आहे. असा कानमंत्र भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची शनिवारी सायंकाळी महत्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. हेमंत सवरा घोडबंदरच्या वाहतूक कोंडीमुळे पोहचू शकले नाहीत. समारोपाच्या भाषणात केळकर यांनी हा कानमंत्र दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने केवळ अपप्रचार केला, नरेटिव्ह सेट करण्याचे काम केले. मात्र आता त्यांच्या या अपप्रचाराला बळी न पडता विधान सभेला विकासकामे घेऊन जनते समोर जा असा सल्लाही त्यांनी दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनचा देखील चुकीचा प्रचार केला जात आहे. मात्र या योजनेविषयी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन ही योजना काय आहे हे समजावून सांगा असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी नवीन मतदार नोंदणी आणि ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणायचे आहे असे सांगितले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव केला गेला. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक व महापालिकेच्या निवडणुकीतील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली.  या बैठकीला भाजपाचे ठाणे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध मोर्चांचे संयोजक व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व कार्यकारिणी, विविध प्रकोष्टचे संयोजक, प्रभाग अध्यक्ष, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष आदींसह पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.

 

टॅग्स :thaneठाणे