शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी यांना यंदाचा पी. सावळाराम पुरस्कार, तर गंगा - जमुना पुरस्कार जयश्री टी. यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 18:24 IST

येत्या १७ डिसेंबर रोजी गडकरी रंगायत येथे पार पडणाऱ्या जनकवी पी. सावळराम पुरस्कार सोहळ्यात यंदा जेष्ठ सिनेनाट्य अभिनेते सुधीर दळवी आणि गंगा जमुना पुरस्कार जेष्ठ सिनेनाट्या अभिनेत्या जयश्री टी. यांना देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देरवी जाधव यांनाही पुरस्कार जाहीरसाहित्यीक अरुण म्हात्रे यांनाही पुरस्कार

ठाणे - जेष्ठ सिनेनाटय अभिनेते सुधीर दळवी यांना जनकवी पी.सावळाराम तर आपल्या अभिनयाने सिनेनाटय क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या  जेष्ठ सिनेनाटय अभिनेत्री जयश्री टी. यांना या वर्षीच्या गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली. दरम्यान प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव, प्रसिध्द साहित्यीक अरु ण म्हात्रे, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामिगरी करणाऱ्या  आदर्श शिक्षिका माधुरी ताम्हणकर यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने रविवार १७ डिसेंबर रोजी गौरविण्यात येणार आहे.           दरवर्षी ठाणे महानगरपालिका व जनकवी पी. सावळाराम कला समिती यांच्या वतीने संगीत, चित्रपट, साहित्य, नाटय, कला व शिक्षण क्षेत्रात अव्दितीय कामिगरी करणाऱ्या  गुणीजनांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. यावर्षी पुरस्काराचे हे १८ वे वर्ष आहे. हा पुरस्कार सोहळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुध्दे, आमदार प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अ‍ॅड.निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, जनकवी पी. सावळाराम कला समिती अध्यक्षा डॉ. कल्पना पाठारे आणि जनकवी पी. सावळाराम कला समिती चे प्रमुख विश्वस्त संजय सावळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्र म होणार आहे.मराठी रंगभूमीसह चित्रपटातून विशेषत: हिंदी चित्रपट, मालिका आणि विविध भाषांतील चित्रपटातही अभिनेते सुधीर दळवी यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. शिर्डी के साईबाबा या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. सुमारे ६० मराठी चित्रपट, २०० हून अधिक हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिका त्यांच्या नावावर जमा आहे. तर गेली दोन दशके लावणी क्षेत्रात भन्नाट नृत्य आणि अभिनय शैलीचा ठसा उमटवणाऱ्या अभिनत्री जयश्री टी. यांना यंदाचा गंगा जमुना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर अरु ण म्हात्रे, (साहित्यिक), माधुरी ताम्हणकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील कामिगरीबद्दल आणि लक्षवेधी कलाकार म्हणून प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. १७ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता राम गणेश गडकरी रंगायतन येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त