शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे पूल पुन्हा अवजड वाहनांसाठी राहणार बंद; १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दुरुस्तीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 10:45 IST

याआधी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पहिली अधिसूचना काढून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.

पारोळ/मीरा रोड : भाईंदर खाडीवरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. या काळात १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान खाडीपूल अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या काळात हलक्या वाहनांना पुलावरून एन्ट्री असली तरी या वाहनांसाठी केवळ एकच मार्गिका खुली असणार आहे. पुलाचे काम सलग तीन दिवस चालणार असल्याने येणाऱ्या तीन दिवसांत मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

भाईंदर खाडीपूल हा तसा जुना झाला आहे. मध्यंतरी या पुलाच्या एका बाजूच्या गर्डरला तडे गेल्याने मोठ्या कालावधीसाठी पूल दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात आला होता, मात्र त्यानंतरही अधूनमधून या पुलाचे काम निघतच आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून याआधी हाती घेण्यात आले होते, मात्र ठाण्यातील वाहतूककोंडीचा जटिल तिढा समोर आल्याने पुलाचे काम करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना महामार्ग प्राधिकरणला दोन वेळा रद्द करावी लागली आहे.

याआधी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पहिली अधिसूचना काढून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवल्याने ही अधिसूचना रद्द करावी लागली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान पुन्हा पूल बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र पुन्हा ही अधिसूचना रद्द करावी लागली. आता १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही अधिसूचना काढून पुलाचे काम अखेर हाती घेण्यात आले आहे. तीन दिवसांच्या काळात पुलाचे काम हाती घेण्यात आले असल्याने अवजड वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पर्यायी मार्गावर  वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवणार आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकroad transportरस्ते वाहतूक