शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पालिका रुग्णालयातील डायलेसिस यंत्रणा व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 23:51 IST

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आठपैकी तीन डायलेसिस यंत्रं बंद

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या मीरा रोड येथील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयातील डायलेसिसची सेवा व्हेंटिलेटरवर आहे. सर्वसामान्य रुग्णांना परवडणारी सेवा असूनही महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आठपैकी तीन डायलेसिस यंत्रं बंद पडलेली आहेत. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.२०१५ मध्ये मोठा गाजावाजा करत पालिका रुग्णालयात डायलेसिसच्या रुग्णांसाठी ही यंत्रे आणण्यात आली होती. परंतु, सदर यंत्रांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी तसेच नव्याने यंत्रखरेदीसाठी प्रशासनापासून स्थायी समिती आणि लोकप्रतिनिधींकडून दिरंगाई केली जात आहे. सध्या आठपैकी तीन डायलेसिस यंत्रे नादुरुस्त झाल्याने अनेक महिन्यांपासून बंद आहेत. तर, सुरू असलेल्या पाचपैकी काही यंत्रे तर एखाद्या रुग्णासाठी वापर होताच नंतर बंद पडतात.डायलेसिस करण्यासाठी पालिकेचे दर परवडतात म्हणून रुग्ण मोठ्या आशेने येथे येत असतात. परंतु, पालिकेच्या गलथानपणामुळे डायलेसिस यंत्रं बंद तसेच नादुरुस्त झाल्याने येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनीदेखील याप्रकरणी पालिकेकडे तक्रार केली आहे. तीन यंत्रे बंद तर अन्य यंत्रेदेखील रामभरोसे असल्याने देखभाल दुरुस्ती आणि नवीन यंत्रखरेदी तातडीने करणे गरजेचे असताना सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाकडून आडमुठेपणा केला जात असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप इनामदार यांनी केला आहे.पालिकेचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पडवळ यांनी सांगितले की, बंद पडलेले तसेच नादुरुस्त यंत्र सुरू करण्यासाठी कंपनीच्या कर्मचाºयास बोलावले आहे. अंदाजपत्रकातही चार नवीन डायलेसिस यंत्रखरेदीच्या खर्चाला मंजुरी मिळालेली आहे. सर्वच यंत्रांच्या देखभाल दुरुस्तीचे वार्षिक कंत्राट दिले जाणार आहे.