शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वेदांत रुग्णालयाला त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करुन पाच दिवसात अहवाल करावा लागणार सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:32 IST

महापालिकेने दिले रुग्णालयाला आदेश

ठळक मुद्देमहापालिका आरोग्य विभागाला पुढील सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशठाणे महापालिका प्रशासनाने वेदांत रुग्णालयाला महत्वाच्या सूचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे  : येथील वर्तक नगर भागात असलेल्या वेंदात हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन अभावी चार जणांचा मृत्यी झाला नसल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून आता स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे ठाणे महापालिकेने आता या रुग्णालयाला होत असलेला प्राणवायुचा पुरवठा, अतिदक्षता विभागातील रुग्ण आणि प्राणवायु पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा यांची नियमीतपणो त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी. यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करुन त्याबाबतचा अहवाल महापालिका आरोग्य विभागाला पुढील सात दिवसात सादर करावा असे आदेश दिले आहेत.

उच्चस्तरिय चौकशी समितीने दिलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे ठाणे महापालिका प्रशासनाने वेदांत रुग्णालयाला महत्वाच्या सूचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या आरोग्याची स्थिती रुग्णांच्या नातेवाईकांना नियमीतपणे देण्यासाठी प्रशिक्षीत व्यक्तींची नियुक्ती करावी, अशा व्यक्तीच्या माध्यमातून व्हिडीओ कॉलद्वारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचेशी संवाद घडवून आणावा. ही कार्यवाही विनाविलंब तात्काळ करण्यात यावी. रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती व रुग्णाची आरोग्य स्थिती वेळोवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना कळविण्याची यंत्रणा निर्माण करावी, जेणोकरून रुग्णालय व्यवस्थापन व रुग्णांचे नातेवाईक यांचेमध्ये गैरसमज होणार नाही. रुग्णालयाला होत असलेला प्राणवायुचा पुरवठा, अतिदक्षता विभागातील रु ग्ण आणि प्राणवायु पुरवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा यांची नियमीतपणो त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी. 

यासाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करुन त्याबाबतचा अहवाल महापालिका आरोग्य विभागाला सादर करावा. ही कार्यवाही ५ दिवसाच्या आत पूर्ण करावी. रुग्णालयाचे अग्निशमन सुरक्षा, विद्युत आणि प्राणवायू पुरवठा प्रणालीचे परिक्षण सक्षम प्राधिकायांकडून तात्काळ करण्यात यावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आरोग्य विभागाला तात्काळ सादर करावा. ही कार्यवाही ७ दिवसांच्या आत पूर्ण करावी, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाthaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार