शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी वेद दुसाची निवड

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 12, 2022 15:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू वेद दुसा याची फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचा जलतरणपटू वेद दुसा याची फिना वर्ल्ड ज्युनिअर ओपन वॉटर चॅम्प‍ियनशीपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. फिना वर्ल्ड चॅम्प‍ियनशीपसाठी भारतीय संघात निवड होणारा वेद हा ठाण्यातील आतापर्यंतचा एकमेव जलतरणपटू आहे.

वेद दुसा हा ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरणतलाव येथे स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे, अतुल पुरंदरे रुपेश घाग यांच्या मार्गदर्शखाली घेत आहे. तो दररोज संध्याकाळी ९ ते ११ सराव करीत असतो. विशेष म्हणजे या स्पर्धेच्या रावासाठी मालवण, पुणे येथे देखील तो स्पर्धेत उतरला होता. याआधी त्याने १६ किमी गोव्यात तर १० किमी पुण्यात स्वीमिंग केले आहे. त्याचा सराव पूर्ण झाला असून आज रात्री फिना वर्ल्ड चॅम्प‍ियनशीपसाठी रवाना होत आहे. वेद दुसा याची निवड झाल्याबद्दल प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी त्यांचे कौतुक केले असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर स्पर्धा ही १५ ते १८ सप्टेंबर या कालावधी सियचल्स देशात होणार असून या स्पर्धेसाठी वेद रवाना होण्यापूर्वी त्याची निवड झाल्याबद्दल नुकतेच केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील तसेच कोकण पदवीधर मंचचे आमदार निरंजन डावखरे यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी दिल्या.

भारतीय जलतरण संघटनेचे महाराष्ट्राचे कन्व्हेनर राजेंद्र पालकर, महाराष्ट्र जलतरण संघटनेचे सदस्य राजेश मोरे यांनी महाराष्ट्राच्या जलतरणपटू भारतीय संघात निवड झाल्याबादल वेदचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त २ संजय हेरवाडे, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, कै. मारोतराव शिंदे तरणतलावाच्या व्यवस्थापक रिमा देवरुखकर कळवा येथील तरणतलावाचे व्यवस्थापक रवि काळे यांनी देखील त्याचे कौतुक करुन त्याला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.