आदीवासी जमातीच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी ‘वसुबारस’ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात नृत्याच्या तालावर साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 08:34 PM2019-10-25T20:34:56+5:302019-10-25T20:42:34+5:30

ठाणेकरांना व येणाऱ्या पुढील पिढीला आदिवासी संस्कृतीची माहिती व्हावी व या आदिवासी समाजातीच्या संस्कृतीचे परंपरेनुसार जतन करण्याचे मार्गदर्शन व धाडस व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तारफा पुतळ्या समोर ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी एकत्र येऊन दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणारा वसुबारस दरवर्षाप्रमाणे आजही साजरी करण्यात आली.

 Vasubaras celebrates tribal culture | आदीवासी जमातीच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी ‘वसुबारस’ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात नृत्याच्या तालावर साजरी

तारफा नृत्याच्या तालावर आदिवास महिला व पुरूषांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात वसबारस शुक्रवारी सकाळी साजरी केली

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यातील आदिवासी एकत्र येऊन दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणारा वसुबारस आदिवासी समाजातीच्या संस्कृतीचे परंपरेनुसार जतनतारपाधारी पुतळ्यास अभिवादन करून आपल्या कुलदैवतांची पूजा

ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी वारली, कोकणा महादेव कोळी, मल्हार कोळी, कातकरी, क- ठाकर व म-ठाकर आदी आदीवासी जमातीच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी तारफा नृत्याच्या तालावर आदिवास महिला व पुरूषांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात वसबारस शुक्रवारी सकाळी साजरी केली.
    ठाणेकरांना व येणाऱ्या पुढील पिढीला आदिवासी संस्कृतीची माहिती व्हावी व या आदिवासी समाजातीच्या संस्कृतीचे परंपरेनुसार जतन करण्याचे मार्गदर्शन व धाडस व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तारफा पुतळ्या समोर ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी एकत्र येऊन दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणारा वसुबारस दरवर्षाप्रमाणे आजही साजरी करण्यात आली. यावेळी आदिवासी वारली समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय भुयाळ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी या तारपाधारी पुतळ्यास अभिवादन करून आपल्या कुलदैवतांची पूजा करून आदिवासी बांधवानी पारंपरिक तारपाधारी नृत्य सादर केले.
         पूर्वजांनी जपून ठेवलेली संस्कृती आधुनिक काळातदेखील तितक्यात ताकदीने जतन करण्याचा प्रयत्न आम्ही आदिवासीबांधव करतो. त्याचाच एक भाग म्हणून ‘वसुबारस’ हा सण येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा भुयाळ यांनी सांगितले. यावेळी आदिवासी समाजातील क्र ांतीकारी राघोजी भांगरा (भांगरे) यांच्या जयंती निमित्ताने देखील आज कोर्ट नाका राघोजी भांगरा चौकात अभिवादन करण्यात आले. या वेळी आदिवासी वारली समाजसेवा मंडळाचे पाडुरंग कांबडी, जयराम वझरे , किसन तुंबडे, कमलाकर सायरे , शांताराम रिंजड, हंसराज खेवरा आदींसह महिला कार्यकर्त्यां मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.
..............
फोटो - २५ठाणे वसुबारस

Web Title:  Vasubaras celebrates tribal culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.