शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईकांचा शपथविधी दिवस ‘बंजारा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 21:30 IST

वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली होती. हाच दिवस आता यापुढे बंजारा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त वाशिमच्या पोहरादेवी येथे एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे वाशीमच्या भक्तिधामात मेळाव्याचे आयोजन समाजातील सर्वपक्षीय नेते यानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार ५ डिसेंबर रोजी वाशिमच्या पोहरादेवी येथे होणार मुहर्तमेढ

ठाणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा बंजारा समाजाचे नेते वसंतराव नाईक यांनी ५ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्टÑाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली होती. त्यानंतर, त्यांनी ११ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवून राज्याचा नावलौकिक वाढवला. शिवाय, अखिल बंजारा समाजाला देखील प्रगतीपथाची दिशा दाखवली. याच दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय बंजारा समाज ५ डिसेंबर हा दिन ‘बंजारा समाज गौरव दिन’ म्हणून साजरा करणार आहे. या गौरव दिनाची मुहूर्तमेढ बंजारा पोहरादेवी (जिल्हा वाशीम) येथील भक्तिधामात ५ डिसेंबर रोजी रोवली जाणार आहे. समाजातील सर्वपक्षीय नेते यानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती बंजारा धर्मपीठाचे संस्थापक किसन राठोड यांनी दिली.राठोड यांनी ठाण्यातील समाजबांधवांना दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, राज्याला हरितक्र ांतीचा मार्ग दाखवणाºया नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळला, तेव्हा महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट होती. त्याच काळातील दुष्काळ म्हणजे महाराष्ट्रावर आलेले अस्मानी संकट होते. मात्र, त्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढून त्यांनी राज्यात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत संपन्न केले. शेती आणि समाज परिवर्तनासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून दोघांनाही परिवर्तनाच्या मार्गावर नेले. अशाच समाजभूषण वसंतराव नाईक यांचा ५ डिसेंबर हा शपथविधी दिवस यंदापासून अखिल भारतीय बंजारा समाज गौरव दिवस म्हणून साजरा करणार आहे. या दिवसाची मुहूर्तमेढ बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा भक्तिधाम येथून रोवण्यात येत आहे. या वेळी भव्य रॅलीचे आयोजन केले असून ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पोहरादेवी भक्तिधाम ते नाईकांचे जन्मस्थळ पुसदमार्गे गहुली स्मृतिस्थळ गौरवभूमी येथे रॅली जाईल. स्मृतिस्थळावर वसंतराव यांना अभिवादन करण्यात येईल. दुपारी भक्तिधाम येथे समाज गौरव दिन सोहळा होईल. या सोहळ्यात समाजातील सर्वपक्षीय नेते तसेच विचारवंत एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामध्ये किसन राठोड, महसूलमंत्री संजय राठोड, माजी मंत्री मनोहर नाईक, मखराम पवार, माजी आमदार धोंडीराम राठोड, आमदार हरिभाऊ राठोड, प्रदीप नाईक, तुषार राठोड आणि बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष राजूसिंग नायक आदी उपस्थित राहणार आहेत.-------एसटी प्रवर्गात समाविष्ट करा - राठोडसमाज गौरव दिन सोहळ्यात समाजाच्या आगामी काळातील संघर्षाची दिशा ठरवणार असल्याचे किसन राठोड यांनी सांगितले. समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून जातीच्या दाखल्यांसाठी १९६१ पूर्वीची रहिवासी पुरावा अट रद्द करावी. तसेच मुंबईत बंजारा भवनसाठी जागा मिळावी, अशा प्रमुख मागण्या या सोहळ्यातून सरकारपुढे ठेवण्यात येणार आहेत. आगामी काळात समाज स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असून त्याबाबतदेखील विचारमंथन केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली......

टॅग्स :thaneठाणेcommunityसमाज