शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वसईत २५ हजार कोटींचा गृहनिर्माण घोटाळा - गावडे

By admin | Updated: May 11, 2016 01:42 IST

महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त, नगररचना विभागाचे उपसंचालक, तत्कालीन सिडको प्राधिकरण आणि एचडीआयएल, एव्हरशाईन डेव्हलपर्स, एव्हरशाईन बिल्डरचे आर्किटक्ट दिवेश शहा

वसई : महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त, नगररचना विभागाचे उपसंचालक, तत्कालीन सिडको प्राधिकरण आणि एचडीआयएल, एव्हरशाईन डेव्हलपर्स, एव्हरशाईन बिल्डरचे आर्किटक्ट दिवेश शहा, अजय वाडे यांनी संगनमताने ५२५ एकर खाजगी अधिक २५ एकर शासकिय जमिनीवर ४ एफसआय देऊन टीडीआर व डीआर यांच्या माध्यमातून रुपये २५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, तथा गटनेते /नगरसेवक धनंजय गावडे यांनी पुराव्यासह केला आहे.एचडीआयएल ग्लोबल सिटी यांची विरार पश्चिम येथील गाव मौजे चिखल डोंगरी, बोळींज व डोंगरे येथील लेआऊटमध्ये एकूण खाजगी मालकीची ५२५ अधिक २५ एकर शासकीय जमीन दाखविण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागांनी केवळ एमएमआरडीएच्या रेंटल हाऊसिंग स्कीम या शेल्टर फॉर आॅल या योजनेसाठी परवानग्या दिल्या होत्या. परंतु एचडीआयएलने या परवानग्यांचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केल्याचा आरोप धनंजय गावडे यांनी केला आहे. एव्हरशाईन बिल्डरचे भागीदार आणि एचडीआयएल ला महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने दिलेल्या विकास परवानग्या तपासल्या असता त्यात गाव मौजे डोंगरे सर्व्हे क्रमांक १४/१, ४,३१, ३२,६८/१, २,३,४,६, ७१/४,९३/१, २ हे सर्व्हे नंबर व हिस्सा क्रमांक समाविष्ट करण्यात आला आहे. याचाच अर्थ एकाच जागेला दोन वेगवेगळ्या विकास परवानग्या देऊन महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त व नगररचना विभागाचे उपसंचालक रेड्डी यांनी गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट होते. रेंटल हाऊसींग स्कीम रद्द झाल्याने ४ एवढा एफएसआय वापरण्याबाबतची योजनादेखील रद्द झाली, असे असताना देखील एचडीआयएलही इतर विकासकांना ३.६९ एफएसआय विकते आहे. एचडीआयएल ने भूमी अ‍ॅण्ड आर्केड डेव्हलपर्स बरोबर दिनांक ११ नोव्हेंबर, २०१० रोजी झालेला करारनामा दस्त क्र. १६२४९/२०१० वसई २ या करारनाम्यातील पृष्ठ क्र. २० वर विकासकाने एकूण १८ हजार ७५५ चौरस मीटर जागेवर ६९ हजार २५२.६० चौरस मीटर इतके क्षेत्र विकले आहे. म्हणजेच त्याने एकूण ३.६९ इतका एफएसआय बेकायदेशीरपणे करून विकला आहे. वास्तविक पाहता रेंटल हाऊसींग स्कीम’ ही शासकीय योजना रद्द झाली असतानाही तत्कालीन सिडको प्रशासन, एचडीआयएल आणि वसई-विरार शहर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त व नगररचना विभागाचे उपसंचालक वाय.एस.रेड्डी यांच्या संगनमताने एमएमआरडीए करीता दिलेल्या परवानग्यांचा आधार घेत हा प्रकल्प राबवित आहे. शासकीय योजनांसाठी शासन जेव्हा परवानग्या देते तेव्हा निरनिराळ्या बाबतीत सवलती देत असते तशा सवलती यामध्ये या प्रकल्पामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यांचा फायदा एचडीआयएल आपल्या खाजगी प्रकल्पासाठी बेकायदेशीरपणे घेत आहेत. (भाग-२ उद्याच्या अंकात)