प्रज्ञा म्हात्रेठाणे : तरुणाईमध्ये क्रेझ असलेला ‘व्हॅलेन्टाइन डे’ दोन दिवसांवर असून, भेटवस्तू देऊन हा प्रेमदिवस साजरा करण्यासाठी शहरातील गिफ्ट्स गॅलरीज्मधील आकर्षक हार्ट, रोझेस तरुणाईला खुणावत आहेत.‘व्हॅलेन्टाइन वीक’ संपत आला असून, ‘व्हॅलेन्टाइन डे’साठी तरुणाईचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. प्रेमाचा दिवस म्हणून सेलिब्रेट होणाºया या दिवसासाठी रोमँटिक, आकर्षक, सुंदर अशा गिफ्ट्स तरुणाईचे लक्ष वेधून घेत आहेत.गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी भरपूर व्हरायटीज गिफ्टमध्ये आहेत. प्रेमाचा रंग हा लाल आणि प्रेमासाठी गिफ्ट्स म्हणून हार्ट आणि रोझेसच्या रूपात भेटवस्तू दिल्या जातात. त्यामुळे लाल रंगातील विविध गिफ्ट्ससोबतच चॉक्लेटचाही तोरा भाव खाणारा आहे.जम्बो भेटकार्डस्, व्हॅलेन्टाइन हार्ट, गोल्ड प्लेटेड रोझेजस, वेल्वेट रोझेस, फिदर रोझेस, गिफ्ट हँपर ज्यात चॉक्लेट, टेडीबिअर आहेत. चॉक्लेट बुके, हार्ट विथ लाईट, टेडी विथ चॉक्लेट बुके, होम मेड चॉक्लेट्स, हँगिंग बास्केट टेडी, पिलो हार्ट, कपल म्युझीक लाईट विथ कोटेशन, कोटेशन विथ टेडी, मेसेज बॉटल निथ टेडी, कोटेशन विथ बुके, बॉटल कोटेशन विथ लाईट (लाल रंगात बॉटल), क्रिस्टल कपल शोपीस, आय लव्ह यू बोलणारे टेडी बिअर, कपल्स टेडी, होडीत छत्री घेऊन बसलेले कपल्स, छत्री घेऊन एकमेकांच्या प्रेमात डुबलेले कपल्स, कपल डुम, मग्स, कपल पिकॉक असे नानाविध गिफ्टस बाजारात आले आहेत. दीड हजार रुपयांचे चॉक्लेट हँपरदेखील आहे. हे प्रथमच व्हॅलेन्टाइननिमित्त पाहायला मिळत आहे.आजी आजोबांसाठीही-भेटवस्तूंच्या दुकानात गेल्यावर आकर्षित करते ते आजी आजोबांचे कपल गिफ्ट्स. एका टेबलावर आजी आजोबा हसत खेळत चहा पित आहेत. दुसºया गिफ्टसमध्ये आजीच्या हातात चहाचा कप आणि आजोबा जणू काही गमतीशीर किस्से तिला ऐकवत आहेत, असे भाव या दोघांच्या चेहºयांवर दिसतात.
व्हॅलेन्टाइन डेचा चढला फिवर : तरुणाईला खुणावताहेत आकर्षक भेटवस्तू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:26 IST