शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील वालधुनी झाली गुलाबी नदी; प्रदूषण कमी होण्याची चिन्हेच नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:20 IST

अंबरनाथमधून वाहणारी वालधुनी नदी गेल्या काही वर्षात सर्वाधिक प्रदूषित नदीत समाविष्ट झाली आहे. गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मदतीने नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प राबवला होता.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे प्रदूषण कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. सर्व सांडपाणी  नदीत सोडले जात असतानाच सोमवारी दुपारी अचानक वालधुनी नदीतील पाणी गुलाबी झाले होते. 

अंबरनाथमधून वाहणारी वालधुनी नदी गेल्या काही वर्षात सर्वाधिक प्रदूषित नदीत समाविष्ट झाली आहे. गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मदतीने नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प राबवला होता. मात्र तरीदेखील नदीचे प्रदूषण कमी झाले नाही. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीतील काही कारखान्यांनी सर्व सांडपाणी या नदीत सोडल्याने आजही  नदी प्रदूषितच आहे. यासोबतच अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील काही जीन्स कंपन्या थेट त्यांचे सांडपाणी नदी सोडत असल्याने या नदीचे रंगदेखील बदलत आहे. सोमवारी दुपारी वालधुनी नदीने गुलाबी रंग परिधान केला होता. संपूर्ण पाणी गुलाबी रंगाचे वाहत राहिल्याने प्रदूषणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. सांडपाणी, रासायनिक पाणी आणि अनेक जीन्स वॉश करणारे कारखानदारदेखील सर्व सांडपाणी वालधुनी नदीत सोडत असल्यामुळे या नदीच्या पाण्याचा रंग बदलत आहे.

वालधुनी नदीचे प्रदूषण सर्वज्ञात असतानादेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे उघडपणे डोळेझाक करीत आहे. वालधुनी नदी प्रदूषित होण्यामागे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सर्वांत मोठा हात राहिला आहे - शैलेश शिर्के,  सामाजिक कार्यकर्ते