शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

1 मे पासून लसीकरण केंद्रे वाढविणार; पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 23:43 IST

पालघर जिल्ह्याचा आरोग्य विभाग सज्ज : आजवर २,०७,८४९ व्यक्तींना दिले डोस

पंकज राऊतबोईसर : पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवक आणि फ्रन्टलाइन वर्कर अशा सुमारे ३४ हजार व्यक्तींना कोरोनाची लस दिल्यानंतर प्रथम ६० व त्यानंतर ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू करून आतापर्यंत पहिला व दुसरा डोस मिळून जिल्ह्यात एकूण २ लाख ७ हजार ८४९ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, १ मे पासून १८ वर्षांवरील  व्यक्तींचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्रे वाढवण्यात येतील, असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

पालघर जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे २० ते २२ लाख आहे. त्यामध्ये ४५ ते ६० वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या सुमारे आठ ते साडेआठ लाख आहे म्हणजेच सुमारे २५ टक्के व्यक्तींना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ७१ शासकीय तर १७ खासगी अशी मिळून एकूण ८८ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती, मात्र लसींचा तुटवड्याअभावी सध्या खासगी लसीकरण केंद्रे बंद ठेवली आहेत. 

दररोज साधारणतः ६,६०० व्यक्तींना लस

येत्या १ मे पासून संपूर्ण राज्यासह पालघर जिल्ह्यात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी शासनाकडून जसजशी लस उपलब्ध होत जाईल, तशी लसीकरण मोहीम सुरू राहील, अशी माहिती जिल्ह्याच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोविल्डशिल्ड १ लाख ९८ हजार तर कोवॅक्सिनचे ६,००० लसींचे डोस उपलब्ध झाले असून लसीकरणाच्या सत्रातून दैनंदिन साधारणतः ६,६०० व्यक्तींना लस दिली गेली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७४ हजार ६४५ जणांना पहिला तर ३२ हजार २०४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. वसई ग्रामीणसह एकूण आठ तालुक्यांतील १ लाख १६ हजार १८१ तर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील ९१ हजार ६६८ व्यक्तींना लस दिली आहे, तर जिल्ह्यात १८ ते  ४५ वयोगटातील सुमारे अडीच ते तीन लाख व्यक्ती असून त्यांना खासगी केंद्रांतून लस दिली जाऊ शकते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसpalgharपालघरVasai Virarवसई विरार