शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्यावतीने ५०० भटक्या श्वानांचे लसीकरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 13:05 IST

Thane News: भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्या वतीने शहरातील ५०० श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात भटक्या श्वानची दहशत वाढत असल्यामुळे गेल्या वर्षभरात शहरात साडेचार हजार जणांना चावा घेतल्याची नोंद जिल्हा रूग्णालयात आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात भटक्या श्वानची संख्या झपाट्याने वाढू लागली असून ही एक मोठी समस्या बनली आहे. भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्या वतीने शहरातील ५०० श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. ठाण्यात सुमारे ७० हजार हून अधिक भटके श्वान असून त्यापैकी महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने२०१४ ते १९ य वर्षात ५८ हजारहून अधिक श्वानांवर नसबंदी केली आहे. मात्र तरीही शहर परिसरात भटक्या श्वानांची दहशत वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाच्या वतीने ही मोहीम न घेतल्यामुळे बऱ्याच श्वानांचा रेबीजमुळे मृत्यूदेखील झालेला आहे. भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नाही. ही मोहीम प्रशासनाच्या माध्यमातून राबविली जात नसल्यामुळे मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने ही मोहीम  शहरात राबविण्यात आली. ही मोहिम शहरातील वसंत विहार, हिरानंदानी मेडोज, कळवा, खारेगाव, लोकमान्य नगर, नौपाडा, जांभळी नाका, घोडबंदर रोड या सर्व परिसरात राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ५०० श्वानांना अँटी रेबीजचे लसीकरण करण्यात आले तसेच लहान पिल्लांना नाईन इन  वन ची लसीकरण देण्यात आली, जेणेकरून त्यांना गॅस्ट्रो व डिस्टेंपर सारखे आजार होणार नाही. 

दरम्यान या मोहिमेअंतर्गत श्वान यांना त्यांच्या गळ्यात रेडियम ची बेल्ट देखील घालण्यात आलेले आहेत. जेणेकरून अंधारात त्यांचा अपघात होऊ नये. तसेच अपघातुळे मृत्यू होणाऱ्या श्वानाचे प्रमाण कमी होईल. दरवर्षी भटक्या श्वानांचा चावा घेतल्याच्या अनेक घटना घडतात, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्यावतीने ५०० श्वानांचे लसीकरण केले.  ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पालिकेमार्फत भटक्या श्वानांचे लसीकरण पुन्हा सुरू व्हावे.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे भटक्या प्राण्यांसाठी असणारे निर्जंतुकीकरण केंद्र जे गेल्या दोन वर्षापासून बंद आहे ते महानगरपालिका प्रशासनाने त्वरित सुरू करावे, जेणेकरून श्वानांची वाढणारी संख्येवर निर्बंध ठेवण्यात येऊ शकेल अशी स्वप्नील महिंद्रकर यांची मागणी आहे.

टॅग्स :thaneठाणेdogकुत्रा