शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

खूनाच्या गुन्हयात आठ वर्षांपासून फरार आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:04 IST

कोपरी येथील कदम्बूल उर्फ ताजामुल उर्फ ताजाम्युल शेख (२२) याचा सुऱ्याने गळा कापून खून करुन पसार झालेला त्याचाच मित्र इनामूल हक याला उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने १ जानेवारी रोजी अटक केली.

ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवाई मित्राचीच गळा कापून केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोपरी येथील कदम्बूल उर्फ ताजामुल उर्फ ताजाम्युल शेख (२२) याचा अज्ञात कारणाने सुºयाने गळा कापून खून करुन पसार झालेला त्याचाच मित्र इनामूल हक याला उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने १ जानेवारी रोजी अटक केली. त्याला ट्रान्सिस्ट रिमांडद्वारे ठाणे येथे आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कदम्बूल याचा १० सप्टेंबर २०१२ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कोपरी येथे त्याचाच मित्र इनामूल याने सुºयाने गळा कापून खून केला होता. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात शेख याचा मित्र इनामूल यानेच तो खून केल्याचे समोर आले होते. या खूनानंतर मुळचा पश्चिम बंगाल येथे राहणारा शेख भूमीगत झाला होता.दरम्यान, खूनासारख्या गंभीर गुन्हयात पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पथक या खूनाचा गेल्या दोन वर्षांपासून तपास करीत होते. तो गोरखपूर उत्तरप्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे या पथकाने चार वेळा गोरखपूर गाठले. मात्र, आरोपीने या पथकाला हुलकावणी दिली. उत्तरप्रदेश आणि नेपाळ येथे स्थानिक बातमीदार तयार करु न त्यांना आरोपीबाबत माहिती देवून त्याचा सुगावा लागल्यास संपर्क साधण्याबाबत सांगण्यात आले होते. दरम्यान, तो नेपाळ येथून गोरखपूर येथे येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे उत्तरप्रदेश येथील एसटीएफच्या मदतीने सहायक पोलीस निरीक्षक गिरी आणि योगेश काकड यांच्या पथकाने अखेर १ जानेवारी २०२१ रोजी गोरखपूर येथून त्याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने या खूनाची कबूली पोलिसांना दिली. गोरखपूर येथील स्थानिक यायालयातून त्याला ट्रान्स्टिस्ट रिमांड घेऊन ठाण्यात आणले जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक