शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थ विक्री राेखण्यासाठी तंत्रज्ञान वापरा; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2023 13:20 IST

नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती व जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी पार पडली.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात अमली पदार्थांचा वापर, विक्री व साठा रोखण्यासाठी पाेलिसांकडून मुरबाड व शहापूर येथील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतीत तपासणी करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यावर ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी जिल्ह्यातील बंद पडलेले कारखाने, गोदामे येथील तपासणी वाढवा. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करा. याशिवाय अमली पदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करा, असे निर्देशही त्यांनी साेमवारी आढावा बैठकीत दिले.

नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती व जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी पार पडली. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले.या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, उत्पादन शुल्क अधीक्षक नीलेश सांगडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त राजेश चौधरी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राठोड, वस्तू व सेवाकर अधीक्षक अंबरीश शिंदे, टपाल कार्यालयाच्या सहायक अधीक्षक अमिता कुमारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश मनोरे आदी उपस्थित होते. जिल्हा पोलिस यंत्रणांमार्फत अमली पदार्थांचा वापर, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती देशमाने यांनी दिली.

अमली पदार्थांमुळे तरुणांचे नुकसान    अमली पदार्थांमुळे तरुणांचे जीवन वाया जात आहे. त्यांच्या कुटुंबावर ही त्याचा परिणाम होत आहे. अशा पदार्थांना रोखण्याची आपली जबाबदारी आहे.    सर्व विभागांनी सतर्क राहून अमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ