शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रिझवानच्या मोबाइलमध्ये सांकेतिक भाषेचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:21 IST

अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांच्या मोबाइल फोनमध्ये लोकांचे मोबाइल नंबर सांकेतिक भाषेमध्ये साठवले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली होती.

ठाणे : अ‍ॅड. रिझवान सिद्दिकी यांच्या मोबाइल फोनमध्ये लोकांचे मोबाइल नंबर सांकेतिक भाषेमध्ये साठवले असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली होती.सीडीआर प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी रात्री बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील रिझवान सिद्दिकी यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी रिझवान सिद्दिकी यांचे तीन मोबाइल फोन आणि दोन लॅपटॉप हस्तगत केले होते. त्यापैकी एक मोबाइल फोन पोलिसांनी पंच व साक्षीदारांच्या समोर सुरू केला. पोलिसांनी हा मोबाइल फोन तपासला असता, त्यामध्ये बºयाच लोकांचे मोबाइल नंबर सांकेतिक भाषेमध्ये साठवले असल्याचे समजले. इंग्रजीतील पहिले नाव व आडनावाचे पहिले आद्याक्षर घेऊन अ‍ॅड. सिद्दिकी यांनी काही मोबाइल नंबर साठवले आहेत. त्याचा अर्थ समजून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती तपास अधिकाºयांनी दिली.मोबाइल फोन्स व लॅपटॉपमधील माहिती नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीकडून केला जाऊ शकतो, अशी शंका पोलिसांनी शनिवारी अ‍ॅड. सिद्दिकी यांना न्यायालयासमोर हजर केले त्या वेळी व्यक्त केली होती. अ‍ॅड. सिद्दिकी यांच्याकडून हस्तगत मोबाइल फोन, लॅपटॉपची तपासणी सुरू आहे. त्यामधील माहिती नष्ट केल्याचीशंका आल्यास ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवून नष्ट केलेली माहिती मिळवली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. बॉलीवूडमधील अनेक अभिनेते अ‍ॅड. सिद्दिकी यांचे अशील आहेत. त्यांच्या अटकेने ठाणे पोलिसांचे हात बॉलीवूडमध्ये आणखी कुणा-कुणापर्यंत पोहोचतात, हेसमजू शकेल.।दामदुप्पट विक्रीया प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली. त्यापैकी एका आरोपीकडून अ‍ॅड. सिद्दिकी यांनी प्रत्येकी १० ते २० हजार रुपयांमध्ये सीडीआर मिळवल्याचा दावा पोलिसांनी शनिवारी न्यायालयामध्ये केला. हे सीडीआर अ‍ॅड. सिद्दिकी त्यांच्या अशिलांना ५० हजार ते १ लाख रुपयांमध्ये विकायचे, असा आरोपही पोलिसांनी केला.