शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

नागरी प्रश्न ही राज्य सरकारची जबाबदारी

By admin | Updated: November 7, 2015 02:31 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक करणे ही पालकमंत्री या नात्याने माझी निश्चित जबाबदारी आहेच. परंतु केंद्र व राज्य सरकारचीही तेवढीच जबाबदारी असल्याने

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक करणे ही पालकमंत्री या नात्याने माझी निश्चित जबाबदारी आहेच. परंतु केंद्र व राज्य सरकारचीही तेवढीच जबाबदारी असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या काळात जाहीर केलेले साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज त्यांना द्यावे लागेल व ते मिळवण्याकरिता मीही कसून प्रयत्न करीन, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी दिली.प्रश्न : महापालिका निवडणूक झाल्यानंतर आता कोणत्या नागरी प्रश्नांना तुम्ही प्राधान्य देणार आहात?शिंदे : वाहतूककोंडी ही केडीएमसीतील सर्वात मोठी समस्या आहे. त्याकरिता विशेषकरून प्रयत्न केले जातील. शहराच्या बाहेरून महामार्ग उभारणे, बायपास तयार करणे, ठाकुर्ली पूर्व-पश्चिम जोडणारा पूल उभारणे, कल्याण व डोंबिवली येथे सॅटीसची निर्मिती करणे अशा अनेकविध उपाययोजना करून वाहतुकीचे विकेंद्रीकरण करावे लागेल. सध्या या दोन्ही ठिकाणी फेरीवाले रस्त्यांवर जागा अडवून बसतात. हॉकर्स झोन उभारून फेरीवाल्यांच्या बेशिस्तीवर नियंत्रण ठेवावे लागेल. अनेक रस्त्यांची अवस्था खराब आहे. केडीएमसीतील नागरिकांना चकाचक रस्ते बांधून दिले जातील. पिण्याचे पाणी ही अनेक भागातील समस्या आहे. त्याकरिता उपाययोजना केली जाईल.प्रश्न: निवडणूक प्रचार काळात शिवसेना व भाजपा, शिवसेना व अन्य पक्ष यांच्यात परस्परांवर बरीच चिखलफेक झाली आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेकरिता भाजपा किंवा अन्य पक्षाची मदत घेतल्यावर निवडणूक काळातील वादांचे सावट कामावर पडणार नाही?शिंदे: निवडणूक संपली की आता वाद, भांडणे संपली. सर्व पक्षांना सोबत घेऊन मतभेद बाजूला सारून, एकदिलाने काम करण्याची आमची भूमिका आहे. केवळ विकासाच्या मुद्द्यावर आता आम्ही एकत्र येऊन शहराचा विकास करणे हेच आमचे उद्दीष्ट राहील. प्रश्न: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार करताना केडीएमसीकरिता साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. मात्र शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला. आता हे पॅकेज मिळणार का? पॅकेज मिळवण्याकरिता तुम्ही काय करणार?शिंदे : पालकमंत्री या नात्याने केडीएमसीकरिता निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी आहे. मात्र माझ्याबरोबरच केंद्र व राज्य सरकारचीही या शहरांचा विकास करणे ही तेवढीच जबाबदारी असल्याने साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज मुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल व त्याकरिता जेवढे प्रयत्न करावे लागतील तेवढे करीन.प्रश्न : केडीएमसीत भाजपाला चांगले यश मिळाले, त्याबद्दल काय वाटते?चव्हाण: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून जी जबाबदारी माझ्यावर दिली ती सार्थ ठरवण्यात मी नव्हे, तर भाजपाच्या कार्यकर्त्यांसह संघ परिवाराची साथ मिळाली. त्यामुळे हे यश माझे नसून परिवाराचे व कार्यकर्त्यांचे आहे. हे यश मिळाल्याने जबाबदारी वाढली असून, आगामी काळातही ज्या ठिकाणी पक्ष कमी पडला तेथे काम वाढवणे हे उद्दिष्ट असेल. पण अनेक वर्षांनंतर केडीएमसी हा भाजपाचाच गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आपल्याकरिता ही सर्वात मोठी उपलब्धी आहे.प्रश्न: निवडणुकीत शिवसेना-भाजपाने एकमेकांवर बोचरी टीका केली, आता बरोबर काम करणार काय?चव्हाण : प्रचाराच्या शुभारंभापासून आम्ही केवळ विकास, स्मार्ट सिटीसंदर्भातच बोलत होतो. त्यात कधीही कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. त्यामुळे टीकाटिप्पणी करणे हे आमचे उद्दिष्ट कधीच नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातही त्यांनी तसे केले नाही, परंतु कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांना चेतवण्याकरिता कानगोष्टी कराव्या लागतात, तेवढेच भाजपाने केले.प्रश्न : महापौर भाजपाचा निवडला जाणार का? चव्हाण: तो निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठी घेतील. पक्षाला डोंबिवलीच नाही तर कल्याण पश्चिम-पूर्व तसेच कल्याण ग्रामीण या सर्व भागात चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे सर्व बाजूने विचार करता सध्या तरी पक्षाकडे ४९ नगरसेवक आहेत. बाकी समीकरण कसे जुळवायचे, त्यावर आताच भाष्य करणे उचित होणार नाही. काय होईल ते अल्पावधीत समजेल.प्रश्न : एवढे करून भाजपाची सत्ता आली नाही तर...?चव्हाण : भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता हा मनापासून काम करतो, हे या निवडणुकीत दिसून आले. त्यातच नागरिकांचाही पक्षाला पाठिंबा आहे, त्यामुळेच परिवर्तन होऊ शकले. आता जनतेलाही भाजपाचाच महापौर आणि सत्ता हवी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. प्रश्न : एकनाथ शिंदेंच्या तुम्ही जवळचे आहात असे बोलले जाते? चव्हाण : मी हिंदुत्वाला सलाम करतो. छ. शिवाजी महाराजांची युद्धनीती, धूर्त खेळी, चाणाक्षपणा हे सर्व गुण आपण केवळ भाषणात ऐकतो. पण प्रत्यक्षात राजकारणात त्या सर्वच गोष्टींचा वापर आपल्याला ठायी ठायी करावा लागतो. या सर्व प्रक्रियेत मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी सर्वांच्याच जवळचा आहे.शब्दांकन : अनिकेत घमंडी