शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पालघर जिल्ह्यातील अवेळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:35 IST

कडधान्ये, पेंढा व विटांचे नुकसान ; आरोग्य धोक्यात येण्याची भीती

वाडा : पालघरमधील वाडा तालुक्यासह इतरही तालुक्यात सलग दोन दिवस रिमझिम झालेल्या पावसाचा रविवारी सकाळी मात्र जोर थोडा वाढला. या अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे पीक तर खराब झाले, परंतु गवत, पावली भिजल्याने तेही वाया गेले. जिल्ह्यातील वीट व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एकूणच अवेळी पावसाने शेतकरी, काबाडकष्ट करणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.सध्या रब्बी हंगाम असून हरभरा, मूग, वाल यासारख्या पिकांवर या अवेळी पावसाचा दुष्परिणाम होणार आहे. तर गवार, मेथी, वांगा, मुळा, मिरची आदी लागवड केलेला भाजीपाला वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच झोडणी करून विक्रीसाठी गंजी रचून ठेवलेला पेंढा या पावसात काळा पडल्याने तो व्यावसायिक सहसा खरेदी करत नाहीत. नुकत्याच सुरू झालेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचेही अवेळी पावसाने नुकसान होणार असून कच्च्या विटा विरघळून जाण्याची भीती आहे.गेले तीन दिवस वातावरणातील सततच्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप व इतर साथींचे आजार बळावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आधीच कोरोनामुळे घाबरलेली जनता या पावसामुळे बदललेल्या वातावरणाने अधिक चिंताग्रस्त झाली आहे.कासात वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसानकासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीट उद्योजक, पावली व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रोगराई पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यात ढगाळ वातावरण असून पाऊस रिमझिम स्वरूपात पडत आहेत. त्यामुळे भाजीपाला लागवड व इतर पिकांवर त्याचा परिणाम होऊन मोठे नुकसान होणार आहे. कासा येथे मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. त्यामुळे गवत पावली विक्रीचा व्यवसाय अनेक जण करतात. मात्र पावसामुळे गवत पावली भिजली असून पाऊस चालू राहिला तर ती कुजण्याची शक्यता व्यावसायिक सुनील पाटील यांनी व्यक्त केली. यामुळे गाई-म्हशींच्या उन्हाळ्यातील चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. दुसरीकडे वीट व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून साधारण व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. विटा पाडण्याचे काम आताच सुरू केल्याने फडावर उभ्या असणाऱ्या विटा भाजण्याच्या आधीच भिजून गेल्या आहेत, तर काही फड कोसळून पडला आहे. त्यामुळे वीट व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही विटांवरील नक्षीचे कामही तुटून गेले आहे.कासा येथे भाजीपाला लागवड त्याचप्रमाणे कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. चालू वर्षी कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे देऊन उत्पादन वाढवण्यासाठी प्रात्यक्षिकेही घेण्यात आली होती. भाजीपाला व मिरची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते. मात्र अवेळी पाऊस आणि खराब हवामान यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे शेतकरी मंगेश केदार यांनी सांगितले. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.