शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मनसेमुळे ठाणे, कल्याणमध्ये शिंदेसेनेत अस्वस्थता, विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला धसका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 12:56 IST

मागील विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात मनसेला थोडी थोडकी नव्हे, तर एक लाख ७० हजार मते मिळाली होती. ही मते महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडणार का, याबाबत कुतूहल आहे.

- अजित मांडके / अनिकेत घमंडी ठाणे / डोंबिवली : महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एन्ट्रीमुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांत शिवसेनेच्या शिंदे गटात पडसाद उमटू लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात मनसेला थोडी थोडकी नव्हे, तर एक लाख ७० हजार मते मिळाली होती. ही मते महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडणार का, याबाबत कुतूहल आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे राजू पाटील यांना मागील वेळी यश मिळाले. या मतदारसंघातून यंदा विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ती जागा महायुतीच्या वाटपात मनसेला जाणार, याची कल्पना आल्याने त्यांच्यातही अस्वस्थता आहे.

ठाणे लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती.  त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांत वाढ झाली. २०१९ मध्ये मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहरात अविनाश जाधव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत मनसेने ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रचार केल्याने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेला खुलेआम मदत केली होती. शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी युतीचा धर्म मोडत मनसेला छुपी मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळेच जाधव यांना या मतदारसंघात ७२ हजार ८७४ मते मिळाली होती. 

ठाणे विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाची मते २०१९ च्या विधानसभेत ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून मनसेला १ लाख ७० हजारांच्या आसपास मते मिळाली. ठाणे विधानसभा मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.  कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते मनसेला मिळाली होती. मीरा-भाईंदर आणि ऐरोली मतदारसंघात मनसे पिछाडीवर होती. 

कल्याण ग्रामीणवरून...कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे आमदार राजू पाटील मागीलवेळी विजयी झाले. शिवसेनेचे शिंदे गटाचे शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी, तालुका स्तरावरील नेते येत्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची स्वप्ने पाहत होते. मनसे महायुतीत आल्याने ती जागा मनसेला सोडल्यास आपली आमदारकीची स्वप्ने धुळीस मिळणार, या कल्पनेने शिवसेनेत अस्वस्थता आहे.

शिवसेनेत हे आहेत इच्छुकरमेश म्हात्रे, राजेश मोरे, रमाकांत मढवी, महेश पाटील, दीपेश म्हात्रे, राजेश कदम यांच्यासह अनेक जण कल्याण ग्रामीण मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. विधानसभेलाही मनसे महायुतीत राहिल्यास त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर बोळा फिरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४