शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी CBI ची कारवाई!
2
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
3
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
4
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
5
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
6
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
7
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
8
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
9
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
10
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
11
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
12
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
13
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
14
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
15
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
16
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
17
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
18
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
19
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
20
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र

मुरबाडमध्ये विनापरवाना बेसुमार वृक्षतोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 23:36 IST

Murbad News : मोह, आंबा, जांभूळ, खैर, ऐन, साग, धावडा या वृक्षांची जफर शेख या कंत्राटदाराकडून बेकायदा तोड केली जात आहे.

 मुरबाड :  मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना वृक्षतोड होत असल्याची तक्रार उपसरपंच भास्कर पतंगराव यांनी मुख्यमंत्री, वनमंत्र्यांकडे केली आहे.मोह, आंबा, जांभूळ, खैर, ऐन, साग, धावडा या वृक्षांची जफर शेख या कंत्राटदाराकडून बेकायदा तोड केली जात आहे. शेख याला एक ते दोन सर्व्हे नंबरची परवानगी घेऊन आजूबाजूच्या जमिनीवरील विनापरवाना तोड केली असल्याची तक्रार पतंगराव यांनी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सायले गाव हाद्दीतील खाते क्रमांक ४७९ मधील सर्व्हे नंबर १४०, १४१, १४३ व त्यांच्यातील हिस्सा नंबरमधील चार हेक्टर ३९ आर जागेतील खासगी जंगलात विनापरवाना वृक्षतोड केली असून, टोकावडे वन कार्यालयात गेले असता, तेथील वनाधिकारी यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे पतंगराव यांनी ऑनलाइन तक्रार केली. तक्रार करून एक महिना झाला, तरीही काहीही कारवाई झालेली नाही. उलट तक्रारदाराला कंत्राटदार व त्याची मुले जीवे मारण्याची धमकी देत असून, त्याबाबत पोलिसात तक्रारही केली.वनक्षेत्रपाल विकास भामरे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, जाफर शेख याने परवानगीपेक्षा जास्त वृक्षतोड केली असेल, तर रीतसर पंचनामा केला जाईल. अतिरिक्त झाडे तोडल्याचे निष्पन्न झाले, तर दंडात्मक कारवाई केली जाईल.प्रशासनाने तातडीने याबाबत चाैकशी करुन दाेषींवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार पतंगराव यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. 

आमदार किसन कथोरे यांनी मला तक्रार मागे घेण्यासाठी फोन केला होता, परंतु कंत्राटदार जाफर शेख व त्याची मुले यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असून, पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मी बेकायदा जंगलतोडीबाबत केलेली तक्रार मागे घेतलेली नसून शेखवर कारवाई होण्यासाठी ठाम आहे.    - भास्कर पतंगराव, तक्रारदारतक्रार मागे घेतलीभास्कर पतंगराव यांनी दिलेली तक्रार आमदार किसन कथोरे यांच्या मध्यस्थीनंतर मिटविण्यात आली आहे.    - जावेद जाफर शेख, कंत्राटदार

टॅग्स :thaneठाणे