शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनधारकांचे ठाण्यात ढोलताशात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:36 IST

वाहतुकीचे नियम मोडले की त्यांच्यावर कारवाई करणारे वाहतूक पोलीस आपण नेहमीच पाहतो. ठाण्यात मात्र थोडा आगळा-वेगळा प्रकार सुरू आहे. येथे वाहतुकीचे नियम मोडले की पोलिसांकडून चक्क ढोल-ताशे बडवून वाहनधारकांचे स्वागत केले जात आहे.

ठळक मुद्देटॅप मोहीमवाहतूक पोलिसांचा अभिनव उपक्रमवाहनधारकांना नियमांबाबत माहिती

ठाणे : टॅप (ट्राफिक अवेअरनेस प्रोग्राम) अर्थात वाहतूक जनजागरण मोहिमेंतर्गत वाहतूक शाखेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वाहतूक नियम मोडणार्‍या वाहनधारकांवर नेहमीप्रमाणे कारवाई करण्याऐवजी त्यांचे ढोल-ताशाने स्वागत केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी भरचौकात केलेल्या या आगळ्या-वेगळ्या स्वागतामुळे ठाणेकरांना आश्चर्याचा धक्का बसला.वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत वाहतूक पोलिसांकडून नेहमीच जनजागरण केले जाते. तरीही त्याचा फारसा उपयोग नाही. वाहतुकीचे नियम सर्वत्र सर्रास तोडले जातात. अशा वेळी कारवाई केल्यास नागरिकांच्या मनात पोलिसांबद्दल कटुता निर्माण होते. त्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी वाहतूक जनजागृती मोहीम सुरु केली. या मोहिमेंतर्गत शनिवारी सिने अभिनेता संतोष जुवेकर यांच्या मदतीने ठाणेकरांनी मजेशीर शिक्षा अनुभवली. यावेळी तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन आणि हरीनिवास सर्कल येथे वाहतूक पोलिसांची पथके संतोष जुवेकर यांच्यासोबत ढोल आणि ताशे घेऊन उभे होते. नियम मोडणार्‍या ठाणेकरांचे यावेळी ढोल-ताश्यांनी स्वागत करण्यात आले. पथकाने वाहनधारकांना त्यांची चूक प्रेमाने लक्षात आणून देत वाहतूक नियमांची माहिती देऊन साक्षर करण्यात आले. यापुढे वाहतूक नियम तोडणार नाही, असे मैत्रीपूर्ण वचन जुवेकर यांनी त्यांच्या स्टाईलने नागरिकांकडून घेतले. महत्वाचे म्हणजे वाहनधारकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई पोलिसांनी केली नाही. याउलट तोडलेला नियम लिहिलेली कि-चेन भेट देण्यात आली. काही वाहनधारकांनी ढोल-ताश्यांवर नाचत मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणेकरांनी वाहतूक नियमांचे महत्व समजून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी जुवेकर यांनी केले.रस्त्यावर उभा असलेला वाहतूक अधिकारी लोकांच्या सुरिक्षततेसाठीच झटत असतो. अशा वेळी नागरिकांनीसुद्धा वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे महत्वाचे आहे. या अभिनव मोहिमेद्वारे ठाणेकरांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. अशा मोहिमा यापुढेही राबविण्यात येतील, असे उपायुक्त अमित काळे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेtraffic policeवाहतूक पोलीस